Amitabh Bachchan-Rekha बिग बी आणि रेखाला एकत्र बघून जयाचा राग अनावर

दोघांच्या चित्रपटातील भूमिकांपेक्षा त्यांच्या अफेयर्सच्या चर्चाच अधिक रंगायच्या. याचा बिग बींची पत्नी अभिनेत्री जया बच्चन यांना प्रचंड त्रास व्हायचा.

बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून आजही अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखाचेच (Rekha) नाव घेतले जाते. पण अशीही एक वेळ होती जेव्हा या हीट जोडीलाच चित्रपटात घेण्यासाठी निर्मातेही आग्रही असायचे. कारण बिग बी आणि रेखा यांच्यातले प्रत्यक्षातील नाते पडद्यावरही खुलायचे. त्यामुळे बिग बी आणि रेखा हे समीकरणच बनलं होतं. त्यांचे चित्रपट म्हणजे पत्रकारांना गॉसिंपिंगसाठी खादयच असायचे. यामुळे या दोघांच्या चित्रपटातील भूमिकांपेक्षा त्यांच्या अफेयर्सच्या चर्चाच अधिक रंगायच्या. याचा बिग बींची पत्नी अभिनेत्री जया बच्चन यांना प्रचंड त्रास व्हायचा.

यामुळे बिग बी आणि रेखा यांना कायमचे एकमेकांपासून दूर करण्यासाठी जया यांनी सर्वतोपरि प्रयत्न केले. जया यांनी निर्मात्यांना अमिताभ बच्चन ज्या चित्रपटात काम करतील त्यात रेखाला घेऊ नका अशी ताकीदही  द्यायला सुरुवात केली होती. पण त्याकाळी बिग बी आणि रेखा यांना एकत्र बघण्यासाठीच प्रेक्षक चित्रपटाला गर्दी करायचे. त्यामुळे चित्रपट हीट व्हायचा त्याचा थेट फायदा निर्मात्यांना व्हायचा. पण जया बच्चन यांच्या ताकीदीमुळे निर्मातेही वैतागले होते.

राम बलराम या चित्रपटासाठी निर्मात्यांनी लीड रोलसाठी रेखा आणि अमिताभ यांची निवड केली होती. हे कळताच जया यांनी निर्मात्याला फोन करुन रेखाला या चित्रपटातून तात्काळ काढून टाकण्यासाठी दबाव आणला. जया यांच्या या आततायीपणामुळे रेखाला अनेक वेळा मनस्तापाचा सामना करावा लागत होता. यामुळे याप्रकारबदद्ल कळताच रेखानेही निर्मात्याला त्या चित्रपटात फुकटात काम करण्याची ऑफर दिली. निर्मात्याने लगेचच ही ऑफर स्विकारत रेखाचीच लीड रोलसाठी निवड झाल्याचे जाहीर केले. यामुळे अधिकच चिडलेल्या जयाने नंतर अमिताभ बच्चन यांच्या मागे या चित्रपटात काम न करण्याचा तगादा लावला. पण त्यावर अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट नकार दिला.

दरम्यान, राम बलराम चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली. त्यानंतर एक दिवस अचानक जया सेटवर पोहचल्या. त्यावेळी रेखा आणि अमिताभ एका सीनबदद्ल बोलत होते. ते पाहताच जया यांना राग अनावर झाला आणि तिथे त्यांनी रेखाबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. रेखाला त्यांनी अक्षरश शिव्या घातल्या. यामुळे रेखाही भडकली आणि दोघींमध्ये जोरदार वाद सुरू झाला. याचदरम्यान जया यांनी रागात रेखाच्या कानशिलात लगावली. हे पाहून अमिताभ बच्चन यांना खूप अवघडल्यासारखे झाले. सेटवर रेखाचा झालेला अपमान बघून त्यांनाही राग आला आणि जयाविनाच ते तिथून निघून गेले. त्यानंतर मिडीयाने जयाच्या या वागण्यावरून त्यांच्यावर टीका केली. सुशिक्षित असूनही जयाने केलेल्या कृतीवरून अमिताभ बच्चन यांनाही टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर रेखाने अमिताभ यांच्याशी बोलणे बंद केले. पण अमिताभ यांनी रेखाची समजुत काढली. त्यानंतर दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले, तसेच अनेक कार्यक्रमांनाही ते रेखाबरोबर जाऊ लागले.