Big Boss 15 Finale : ‘या’ तारखेला होणार बिग बॉस 15 चा ग्रॅंड फिनाले

बिग बॉसचा यंदा 15 वा सीजन सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. या शोचे अनेकजण दीवाने असून, लाखो प्रेक्षकवर्ग आहेत. हा शो आता एका रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक उत्सुकतेची गोष्ट म्हणजे बिग बॉस 15 चा ग्रॅंड फिनाले. 

बिग बॉसचा यंदा 15 वा सीजन सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. या शोचे अनेकजण दीवाने असून, लाखो प्रेक्षकवर्ग आहेत. हा शो आता एका रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक उत्सुकतेची गोष्ट म्हणजे बिग बॉस 15 चा ग्रॅंड फिनाले. सलमान खानच्या शोच्या 15 व्या सीझनचा विजेता कोण होणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना खूप उत्सुकता आहे? यंदाच्या विजेत्याची ट्रॉफी कोणाच्या हातात असेल? चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता पाहायला मिळत आहे.या शोच्या विजेत्या स्पर्धकांच्या यादीत शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, निशांत भट, रश्मी देसाई आणि प्रतीक सहजपाल असून, हे स्पर्धक अंतिम फेरीत आले आहेत. येत्या 30 जानेवारीला बिग बॉस 15 चा ग्रँड फिनाले असणार आहे. या शो चे शेवटचे भाग शनिवारी आणि रविवारी प्रसारित केले जातील. तर विजेत्याचं नाव रविवारी घोषित करण्यात येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

प्रत्येकाला फक्त आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनायचे आहे. शोचा हा शेवटचा आठवडा आहे. या शोमध्ये सुरुवातीपासूनच अनेक ट्विस्ट आणि टर्न चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. बिग बॉस 15 चा फिनाले गेल्या आठवड्यात 16 जानेवारी रोजी होणार होता, परंतु 2 आठवड्यांपूर्वी सलमान खानने कुटुंबियांना आश्चर्यचकित केले आणि सांगितले की शोला दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

जसजसा बिग बॉस 15 त्याच्या अंतिम फेरीकडे वाटचाल करत आहे, तसतसा या रिअॅलिटी शोचा खेळ अधिक मनोरंजक होत आहे. फायनलमधील स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे बिग बॉस 15 चा ग्रँड फिनाले पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.


हे ही वाचा – सर्वाधिक श्रीमंत पक्ष भाजप, काँग्रेसपेक्षा बसपाची संपत्ती जास्त, ADR अहवाल जाहीर