घरमनोरंजनमनोरंजनाने भरलेला पाचवा दिवस

मनोरंजनाने भरलेला पाचवा दिवस

Subscribe

सगळ्यात उत्सुकतेची गोष्ट म्हणजे बिग बॉस मराठी सिझन २ चा पहिला कॅप्टन कोण होईल हे आज कळणार आहे. याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच आहे.

बिग बॉसच्या घरात कालचा दिवस खूप वादग्रस्त ठरला. विणा आणि नेहाला डोक्यावर अपात्र लिहून आणि गळ्यात पाटी लटकवून घरामध्ये वावरण्यास बिग बॉस यांनी सांगितले .तर काल पराग आणि वैशालीमधील वाद, रुपाली, नेहा आणि अभिजित बिचुकले मधील वाद खूप टोकापर्यंत गेला. एकीकडे विणा आणि शिवानीमध्ये बाचाबाची झाली तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात KVR ग्रुप तयार झाला.

- Advertisement -

काय आहे KVR ग्रुप

आजचा दिवस जरा हलकाफुलका जाणार आहे. सगळ्या सदस्यांच्या आजच्या दिवसाची सुरुवात नागिन डान्स या धम्माल गाण्याने होणार आहे. KVR ग्रुपचे बॉनडिंग आणि काय आहे त्यांची इच्छा हे बघायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात जोपर्यंत लाईट्स बंद होत नाही तोपर्यंत सदस्यांना झोपण्यास सक्त मनाई असते. आज बरेच सदस्य या नियमाचे उल्लंघन करताना दिसणार आहेत.
सगळ्यात उत्सुकतेची गोष्ट म्हणजे बिग बॉस मराठी सिझन २ चा पहिला कॅप्टन कोण होईल हे आज कळणार आहे. याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. अभिजित बिचुकले यांच्या टीम मधून नेहा आणि वैशाली म्हाडेच्या टीम मधून शिव यांना कॅप्टनसीची उमेदवारी देण्यात आली आहे. घरातील सदस्य कोणाला देणार पहिला कॅप्टन बनण्याचा मान आज कळेल.

- Advertisement -

घरात रंगणार अंताक्षरी

बिग बॉसच्या घरात मोबाईल, टीव्ही, पेपर, अशा कुठल्याही करमणुकीच्या साधनांशी संबंध तुटतो. यांच्याजवळ कुठलही मनोरंजनाच साधन नसताना काही मोजकेच पर्याय उरतात. त्यामुळे संपूर्ण दिवस काय करायचं हा मोठा प्रश्न सदस्यांसमोर असतो. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये एकापेक्षा एक कलाकार असल्यामुळे कधी गाण्याची मैफल रंगते तर कधी स्वादिष्ट पदार्थ खायला मिळतात. तर सुरेखाताई कधी लावणी आणि त्यातील अदा शिकवताना दिसतात. आज बिग बॉसच्या घरामध्ये सुरेल अंताक्षरी रंगणार आहे. ज्यामध्ये अभिजित केळकर याने खूप सुंदर गाणी सादर केली जसे चंदा रे चंदा रे, ये राते ये मौसम, ससा रे ससा हे गाण देखील या अंताक्षरीत सदस्यांनी म्हटले आहे. याचबरोबर वैशालीचा मधुर आवाज देखील बऱ्याचदा घरामध्ये ऐकू येतो आणि अंताक्षरीमध्ये देखील तिची सुरेल गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -