घरमनोरंजनबिग बॉस फेम स्वामी ओम यांचे निधन

बिग बॉस फेम स्वामी ओम यांचे निधन

Subscribe

अर्धांगवायूचा आला होता झटका

बिग बॉस सीजन १० चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे आज निधन झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यातच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. बुधवारी त्यांना उपचारांसाठी एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. परंतु आज त्यांनी दिल्लीतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.स्वामी ओम यांचे मित्र मुकेश जैन यांचा मुलगा अर्जुन जैन यांनी ही बातमी दिली आहे. अर्जुनच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी स्वामी ओम यांनी अर्धांगवायूचा झटका आला होता. तसेच यापूर्वी त्यांनी कोरोनाची लागणा झाली होती. परंतु त्यातून ते सुखरुप बरे झाले पण त्यांना चालताना त्रास होऊ लागला.

आज दुपारी स्वामी ओम यांच्यावर दिल्लीतील निगम बोध घाटात अंत्यसंस्कार होणार आहेत. बिग बॉसच्या १० व्या सीजनमधील वादग्रस्त स्पर्धक म्हणून ते नेहमी चर्चेत होते. त्याचप्रमाणे राजकीय वर्तुळात देखील त्यांनी विशेष ओळख होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वामी ओम यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली होती.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -