घरमुंबईBMC budget 2021 : मुंबईकरांवरील मालमत्ता करवाढीचे संकट टळले

BMC budget 2021 : मुंबईकरांवरील मालमत्ता करवाढीचे संकट टळले

Subscribe

महापालिका आयुक्तांनी मांडले मुंबई व्हिजन 2030 चे ध्येय

मुंबई महापालिका आयुक्त ईक्बाल सिंह चहल यांच्याकडून स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना २०२१-२२ चा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला. नागरी सुविधा, जागतिक दर्जानुसार शहरातील सुधारणा करण्यासाठीच व्हिजन २०३० च्या मानकांचे नियोजन करण्यात आले आहे . त्यानुसारच यंदाचे अर्थसंकल्पीय अंदाज वर्तवण्यात आले आहेत. कोव्हिडच्या महामारीने लक्ष्य हे आरोग्यावर केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली. महामारी आटोक्यात आणण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. यंदा आरोग्यावर आरोग्यावर मोठा खर्च करण्यात आला. पण त्याचवेळी महत्वाच्या अशा आवश्यक कामावर खर्च करण्यात आम्ही यशस्वी झालो असे चहल यांनी सांगितले. कोव्हिड महामारीमुळे वाढीव खर्च होतानाच उत्पनातील घट यासारख्या संकटाचा सामना महापालिकेला करावा लागला. शहर, पर्यावरणपूरक व आपत्कालीन घटनामुक्त आणि आनंददायी जीवनाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तसेच जागतिक दर्जाच्या नागरी सुविधांचे ध्येय २०२१-२२ चा अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प हा ३९,०३८.८३ कोटींचा आहे. गतवर्षीच्या म्हणजे २०१९-२०२० च्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प हा ५,५९७. ८१ कोटी रुपयांनी जास्त आहे. मुंबईकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे यंदा मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. आगामी काळातील महापालिका निवडणूक लक्षात ठेवूनच हा दिलासा मुंबईकरांना देण्यात आल्याचे समजते. मुंबईकरांसाठीचा मालमत्ता कर वाढीची सुधारणा ही एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्याचे चहल यांनी सांगितले. (NO hike in property tax in BMC budget 2021)

कोविडच्या महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर वसुलीवर परिणाम परिणाम झाला आहे. मुंबई महापालिकेचे भांडवली खर्च वाढले आहेत. त्यामुळेच महसूली संकलन सुधारणा करण्याची गरज असल्याचे चहल म्हणाले. आगामी काळात नवीन साधनस्त्रोत शोधण्याच्या उदिष्टाने त्यांचा समावेश हा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. २०२१-२२ चा अर्थसंकल्पीय अंदाज ३९,०३८.८३ कोटी प्रस्तावित असून २०२०-२१ च्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प हा १६.७४ टक्क्यांनी जास्त आहे. महापालिकेचा भांडवली खर्च वाढला असून २०२०-२१ मध्ये तो अंदाजे १० हजार ९०३.५८ कोटी इतका होणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. दोन वर्षातच भांडवली खर्चात १८,७५०.९९ कोटी इतकी लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. सातव्या वेतन आयोगामुळे आस्थापना खर्चात वाढ झाल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

मालमत्ता करवाढ टळली

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नामध्ये यंदा २२६८.५८ कोटी इतकी घट झाली आहे. २०२०-२१ मध्ये मामलत्ता करापोटी मिळणारे उत्पन्न हे ६७६८.५८ कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ४५०० कोटी रूपयांचीच वसुली २०२०-२१ मध्ये होऊ शकली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे मोठे, छोटे उद्योगधंदे बंद झाल्याने मालमत्ता कराच्या संकलनावर त्याचा परिणाम झाला. तसेच मालमत्ता कर वसुलीच्या विभागातील कर्मचारी हे कोरोनाच्या महामारीच्या लढ्याविरोधात कार्यरत होते त्याचाही परिणाम वसूलीवर झाला. भांडवली मूल्यामध्ये सुधारणा करण्याचे १३ नोव्हेंबर २०२० च्या अध्यादेशानुसार २०२१-२२ साठी पुढे ढकलण्यात आले आहे. नागरिकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मालमत्ता करांची देयके ही २०१९-२० नुसारच आकारण्यात येणरा आहेत. त्यामुळेच मालमत्ता करामध्ये वाढ होणार नाही असे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

 

- Advertisement -

 

 

 

 

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -