Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Bigg Boss 14 Winner: रुबिना दिलैक बिग बॉस 14 च्या विजेते पदाची...

Bigg Boss 14 Winner: रुबिना दिलैक बिग बॉस 14 च्या विजेते पदाची मानकरी

Related Story

- Advertisement -

नुकताच बिग बॉस १४ च्या पर्वाचा रंजकदार ग्रँड फिनाले पार पडला. यंदाच्या पर्वाच्या विजेते पदाची मानकरी Rubina Dilaik ठरली आहे. त्यामुळे बिग बॉस १३ नंतर बिग बॉस १४ च्या सीजनमध्येही महिला राज पाहयला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावरही रुबिना आणि राहुल वैद्यच्या नावाला पसंती मिळत होती. त्यामुळे या दोन स्पर्धकांपैकी कोणतरी एक विजेता नक्की असेल असे अनेकांचे मत होते. आणि तसेच झाले. रुबिनाने राहुल वैद्यला बाद करत बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तर राहुल वैद्यने बिग बॉस १४ व्या सीझनचा उपविजेता म्हणून मजल मारली. तसेच निक्की तांबोळी दुसरी उपविजेती ठरली आहे.

रुबिनाने यंदाचा सीजन गाजवला होता. पहिल्या दिवसापासूनच रुबिना सारे जण एक स्ट्राँग कंटेस्टंट मानत होते. कारण प्रत्येक गोष्टीत ती बिधास्तपणे आपले मत मांडत होती. रुबिनाने पती अभिनव शुक्लासोबत घरात प्रवेश केला. यावेळी दोघांच्या पर्सनल नात्यातील दुरावा जगजाहीर झाला. मात्र सतत एकमेकांसोबत राहिल्या दोघांमधील मतभेद दूर झाले आणि रुबिना अभिनव ही जोडी एक लव्हबर्डप्रमाणे पुन्हा एकत्र आले.

- Advertisement -

मात्र पती अभिनवसोबत असतानाही रुबिनाचा बिग बॉसच्य़ा घरातील प्रवास कठीण होता. कारण अनेक स्पर्धकांनी तिच्यावर आरोप प्रत्यारोप केले. अनेकांनी तिला तु डॉमिनेटिंग आहेस असे म्हणत खूप चिडवण्याचा प्रयत्न केला. मात्र रुबिना प्रत्य़ेकाशी पंगा घेत होती. गरज वाटली तेव्हा तिने होस्ट सलमान खानसोबतही भांडण करण्यास मागे हटली नाही. अनेकदा तिचे राहुल वैद्यसोबत वाद व्हायचे. या वादातील अग्रेसिव्हपणा अंतिम सामन्यातही पाहायला मिळाला. मात्र राहुल वैद्यची कडवी झुंज देत अखेर रुबिनाचे विजेते पदाच्या ट्रॉफीवर गवसणी घातली. यावर्षीच्या सीझनमध्ये 23 स्पर्धक सहभागी झाले होते. महाअंतिम सोहळ्याचा शेवटचा क्षण सारेच स्पर्धक भावनिक झालेले पाहायला मिळाले. यावेळी बिग बॉसने राहुल आणि रुबीना यांच्यात या मोसमात कशाप्रकारे स्पर्धा रंगली, त्यांच्यातील असलेल्या टोकाच्या मतभेदाची आठवण करुन दिली. अंतिम क्षणी घरातून बाहेर पडताना राहुल, रुबिना दोघी खूप भावूक झाले. राहुलने जाता जाता बिगच्या घराला नमस्कार केला आणि बिग बॉसच्या सलमान खानचे देखील आभार मानले.


हेही वाचा- रणवीर सिंगचा ‘८३’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


- Advertisement -

 

- Advertisement -