Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रणवीर सिंगचा '८३' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

रणवीर सिंगचा ‘८३’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट 4 जून 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन ठप्प झाले होते. मात्र अनलॉकनंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येताच, अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान ’83’ हा रणवीर सिंगचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणवीर सिंगने इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. ’83’ हा चित्रपट 4 जून 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 25 जून 1983 रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयावर आधारित ’83’ हा चित्रपट दिग्दर्शक कबीर खानने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

- Advertisement -

 

विविध चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश

या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह हा कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. तर आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तर भारताचा माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांची भूमिका साहिल खट्टर साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. रणवीरने या चित्रपटासाठी टीमने प्रचंड मेहनत घेतली असल्याचे सांगितले.

- Advertisement -

25 जून 1983 या दिवशी लंडनच्या लॉडर्स मैदानावर क्रिकेटमधील सर्वात मोठया धक्कादायक निकालाची नोंद झाली. माजी क्रिकेटपटू कपिल देव हे भारतीय संघाचे कर्णधार असताना 1983 मध्ये भारताने पहिला विश्वचषक जिंकला होता. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने बलाढय वेस्ट इंडिजवर 43 धावांनी विजय मिळवला आणि भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याची करामत केली. भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवला. याच विश्वविक्रमाची गाथा या चित्रपटात दाखवली आहे.


हेही वाचा – रणवीरने या चित्रपटासाठी टीमने प्रचंड मेहनत घेतली असल्याचे सांगितले.

- Advertisement -