घरताज्या घडामोडीBigg Boss 15 च्या घरात प्रवेशापूर्वीच 'या' सदस्याला पॅनिक अटॅक!

Bigg Boss 15 च्या घरात प्रवेशापूर्वीच ‘या’ सदस्याला पॅनिक अटॅक!

Subscribe

कलर्स वहिनीवरील लोकप्रिय शो बिग बॉस सीझन १५ मधील एका सदस्याला घरात प्रवेश करण्यापूर्वीच पॅनिक अटॅक आल्याचे समोर आले आहे. या सदस्याचे नाव अफसाना खान असे आहे. जेव्हा लोकप्रिय पंजाबी गायिका अफसाना खान बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचे समजल्यानंतर चाहते तिला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. परंतु माहितीनुसार बिग बॉसच्या घरात आता अफसाना खान प्रवेश करणार नाही आहे. ती बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर झाली आहे.

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, गेल्या रात्री हॉटेलमध्ये अफसाना खान हिला पॅनिक अटॅक आला होता. त्यानंतर घटनास्थळी निर्मात्यांनी मेडिकल सुविधा पाठवली. पॅनिक अटॅक आल्यानंतर अफसानाने शोमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वृत्ताच्या माहितीनुसार, अफसाना पंजाबला परतली आहे असून ती सलमान खानच्या बिग बॉस सीझन १५मध्ये भाग घेणार नाही आहे.

- Advertisement -

दरम्यान अफसाना खान बिग बॉसमध्ये प्रवेश करण्यास तयार नव्हती. तिने प्रोमो शूट केला होता, जो कलर्सने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. तसेच ती काही दिवसांपासून मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन होती. त्याच दरम्यान गेल्या रात्री तिला पॅनिक अटॅक आला. या बातमीमुळे अफसानाच्या चाहत्यांमध्ये आता निराशेचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – Raj Kundra Case : राज कुंद्राला शर्लिन चोप्राच बोल्ड कंटेंट इंडस्ट्रीत घेऊन आली, गहना वशिष्ठचा आरोप


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -