घरमनोरंजन'बिग बॉस १६' मध्ये असणार वॉटर थिम; पहिली झलक आली समोर

‘बिग बॉस १६’ मध्ये असणार वॉटर थिम; पहिली झलक आली समोर

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या किच्चा सुदीपच्या विक्रम रोना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सध्या अनेकजण हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉसची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान होस्ट करत असलेल्या या वादग्रस्त कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. प्रत्येक वर्षी यामध्ये अतरंगी कलाकार येतात. त्यामुळे यावर्षी नक्की कोण-कोण पाहायला मिळणार आहे. याच्याकडे अनेकांच लक्ष लागून राहिले आहे. गेल्या पर्वात अभिनेत्री तेजस्वी प्रकाश विजेती झाली होती. सध्या अभिनेता सलमान खान या रियालिटी शोचं प्रोमो शूट करत असून याची एक झलक समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या किच्चा सुदीपच्या विक्रम रोना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. परंतु यादरम्यान, त्याने या शोचा प्रोमा शूट केला आहे. त्याचे फोटो आता समोर आले आहेत.

- Advertisement -

‘बिग बॉस १६’ मध्ये असणार वॉटर थिम

 

View this post on Instagram

 

A post shared by Bigg Boss 16 (@biggboss_season_16)

‘बिग बॉस १५’ प्रमाणेच ‘बिग बॉस १६’ मध्ये सुद्धा थिमवर आधारित असणार आहे. ‘बिग बॉस १६’ मध्ये वॉटर थिम असणार आहे. पूर्ण घरामध्ये त्याप्रकारची डिजाइन सुद्धा पाहयला मिळत आहे. यातील पहिली झलक आता समोर आली आहे. ज्यामध्ये स्काई ब्लू रंगाचं घर दिसून येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, सलमान खान बिग बॉस व्यतिपरिक्त  ‘टाइगर 3’, ‘बजरंगी भाईजान 2’ आणि ‘किक 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.


हेही वाचा :मलेरिया दादूस आयला रं…’टाईमपास ३’ मध्ये झळकणार जयेश चव्हाण

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -