Bipasha basu Birthday: वाढदिवसाच्या दिवशी बिपाशाचं नवऱ्यासोबत लिपलॉक व्हायरल

बिपाशा तिचा पती अभिनेता करण सिंह ग्रोवर सह दरवर्षी वाढदिवस मोठ्या धुमधड्याक्यात साजरा करते. मात्र या वर्षी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बिपाशाला वाढदिवस साजरा करता आला नाही त्यामुळे बिपाशा थोडीसी नरवस झाली आहे

Bipasha basu Birthday: Liplock viral with Bipasha husband on his birthday
Bipasha basu Birthday: वाढदिवसाच्या दिवशी बिपाशीचं नवऱ्यासोबत लिपलॉक व्हायरल

बंगाली ब्यूटी बिपाशा बासू (Bipasha basu)  आज तिचा ४३वा वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशी नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. बिपाशाचा बोल्डनेस तिची खासियत झाली आहे. बिपाशाने तिच्या नवऱ्यासोबत घरीच वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाची धम्माल मस्ती बिपाशाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. बर्थ डे केक कापताना बिपाशीचा नवऱ्यासोबतचा लिपलॉक व्हिडीओ तिने शेअर केला असून सोशल मीडियावर हा लिपलॉक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे.

बिपाशाचा बर्थ डे प्लॉन झाला रद्द

बिपाशा तिचा पती अभिनेता करण सिंह ग्रोवर सह दरवर्षी वाढदिवस मोठ्या धुमधड्याक्यात साजरा करते. मात्र या वर्षी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बिपाशाला वाढदिवस साजरा करता आला नाही त्यामुळे बिपाशा थोडीसी नरवस झाली आहे. यंदा बिपाशाला घरीच वाढदिवस साजरा करावा लागला मात्र सेलिब्रेशन घरी असले म्हणून काय झाले बिपाशाच्या नवऱ्याने सेलिब्रेशनमध्ये कोणतीही कमी सोडलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी बिपाशाच्या घरी सुंदर फुग्यांचे डेकोरेशन करण्यात आले होते. करण सिंह ग्रोवरने बिपाशासाठी छान रोमँटीक पोस्ट देखील लिहिली आहे. बिपाशासाठी स्पेशल केक ऑर्डर केले होते. बिपाशा आणि करणने रोमँकीट अंदाजात केक कटिंग केला. केक कटींग करताना बिपाशा आणि करणचा लिपलॉक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘इट्स माय बर्थ डे’, असे म्हणत बिपाशाने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

 

View this post on Instagram

 

A post shared by karan singh grover (@iamksgofficial)

‘मेरी प्यारी प्यारी बेबी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रेम, आनंद आणि हास्याने भरलेला असो. तुझ्यासारखी अद्भूत व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. बेबी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा’,असे म्हणत करणने बिपाशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले आहे.


हेही वाचा – Irrfan Khan Birthday : इरफान खानचे ‘हे’ प्रसिद्ध चित्रपट पाहिलात का?