घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंना दिशाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पुन्हा त्या चर्चेला उधाण!

आदित्य ठाकरेंना दिशाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पुन्हा त्या चर्चेला उधाण!

Subscribe

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंची मैत्रीण व अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आदित्य ठाकरे. असाचं चमकत राहा आणि शानदार प्रगती कर’, असं दिशाने ट्विट केलंय.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत डिनरमुळे दिशा पटाणी गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. दिशा आज आपला २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तर आदित्य ठाकरेंचा हा ३० वा जन्मदिवस. दोघांच्या मैत्रीविषयी कुणीही उघडपणे बोलत नसलं, तरी अनेक पत्रकार आदित्य ठाकरे यांना “आपल्या आयुष्याला नवी ‘दिशा’ कधी मिळणार?” असे आडूनआडून प्रश्न विचाराले जातात.

- Advertisement -

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी देशात आणि राज्यात असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवसैनिकांनी असतील त्या ठिकाणाहूनच शुभेच्छा देण्याची विनंती त्यांनी केली आहे. दरवर्षी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसैनिकांना पत्र लिहित आवाहन केलं आहे.

- Advertisement -

 दिशाने मुलाखतीत केलं आदित्यचं कौतुक

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दिशाने आदित्य ठाकरेंच्या मंत्रीपदावर प्रतिक्रिया दिली होती. “आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या कामावर मला खूप विश्वास आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि आदित्यसारखा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच चांगली गोष्टी आहे”, असं ती म्हणाली होती. आदित्य यांच्या कामाची स्तुती करत ती पुढे म्हणाली, “ते पर्यावरण संवर्धनासाठी बरंच काही करत आहेत. खास करून जंगल वाचवण्यासाठी त्यांनी चांगले पाऊल उचलले आहे. आता महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे. त्यांनी मुंबईच्या नाइट लाइफला चालना दिली आहे. आता तुम्ही रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरु शकता, सिनेमा पाहू शकता. नाइट लाइफच्या संकल्पनेवर त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे.”आता दिशा पटाणीने केलेल्या ट्विटमुळे पुन्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.


हे ही वाचा – बाथरूमच्या खिडकीचे गज तोडून दोन केैद्यांचे येरवडा जेलमधून पलायन!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -