घरमनोरंजनतापसीच्या ट्विटवर कंगनाने 'हे' रिट्विट करत साधला निशाणा

तापसीच्या ट्विटवर कंगनाने ‘हे’ रिट्विट करत साधला निशाणा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या ट्विटर अकाउंटवर नेहमीच सक्रिय असते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या ट्विटर अकाउंटवर नेहमीच सक्रिय असते. तिच्या ट्विटमुळे ती नेटकऱ्यांच्या चर्चेत असते. दरम्यान कर चुकवल्याच्या आरोपाखाली आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकले. अभिनेत्री तापसी पन्नूने या आयकर विभागाच्या कारवाईवरील आपले मौन सोडले असून एका ट्विटद्वारे तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपावर उत्तर देताना ती असे म्हणाली की,आता मी स्वस्त राहिली नाही. तापसीच्या या ट्विटवर कंगना रनौतने निशाणा साधला आहे. ‘तू नेहमीच स्वस्त राहशील, कारण तू रेपिस्टची फेमिनिस्ट आहेस. २०१३ मध्ये तुझे रिंग मास्टर अनुराग कश्यपच्या टॅक्स चोरीच्या कारणामुळे छापेमारी झाली होती. सरकारी अधिकाऱ्यांचा अहवाल आला आहे. जर तु निर्दोष असशील तर त्याच्या विरुद्ध कोर्टात याबाबत स्पष्टीकरण दे. ए स्वस्त, तू हे करु शकते’ असे रिट्विट करत कंगनाने तापसीवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

३ मार्चला बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यक, विकास बहल आणि अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरावर आणि मालमत्तांवर आयकर विभागाने छापा टाकला. पुणे, मुंबईसह २२ ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी केली. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे तापसी आणि तिचे कुटुंबीय नाराज असून तापसीने तीन ट्वीट करून आपली बाजू माडण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तापसी अनुराग प्रकरण: कशाला बोंबलता? २०१३मध्येपण आयकर धाडी पडल्या होत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -