घरताज्या घडामोडीवरुण धवन २४ जानेवारीला बोहल्यावर चढणार!

वरुण धवन २४ जानेवारीला बोहल्यावर चढणार!

Subscribe

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलालचे कुठे होणार लग्न? झाला खुलासा

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या लग्नाबद्दल सध्या जास्तच चर्चा सुरू आहे. आता त्यांच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. लवकरच वरुण धवन मैत्रिण आणि फॅशन डिझायनर नताशा दलालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. याबाबतची माहिती धवन कुटुंबियांच्या जवळच्या सुत्राने दिली आहे. माहितीनुसार वरुण धवन आणि नताशा दलाल एकाच शाळेत शिकत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. पण आता दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाबाबत सुत्राने पीटीआयला सांगितले की, ‘२४ जानेवारीला अलिबागमध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत हिंदू रुढी-परंपरानुसार वरुण आणि नताशाचे लग्न होणार आहे. लग्नाच्या पूर्वीच्या सोहळ्याची सुरुवात २२ जानेवारीपासून होणार आहे.’ वरुण-नताशाचे २०२० मध्ये मे महिन्यात लग्न होणार होते. परंतु कोरोना काळ असल्यामुळे वरुण-नताशाचे लग्न २०२१मध्ये पुढे ढकलण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

- Advertisement -

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच वरुण धवनचाय ‘कुली नंबर १’ (Coolie No. 1) प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील वरुण आणि सारा अली खान (Sara Ali Khan) केमेस्ट्री लोकांना खूप आवडली होती. पण चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. यापूर्वी वरुण धवन ‘स्ट्रीट डान्सर’ चित्रपटात दिसला होता.


हेही वाचा – ड्रेस फाटलेला असताना जॅकलिनने काढला सेल्फी अन्

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -