घरताज्या घडामोडीतर माफी मागेन आणि ट्विटरही सोडेन, कंगनाचं आव्हान

तर माफी मागेन आणि ट्विटरही सोडेन, कंगनाचं आव्हान

Subscribe

अभिनेत्री कंगना रनौतने आता नवीन आव्हान दिले आहे. शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले हे सिद्ध करा आणि आरोप सिद्ध केला तर माफी मागून ट्विटर सोडेन, असे कंगना रनौत म्हणाली आहे. दरम्यान कंनाने राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी संबंधित विधेकांना विरोध करणाऱ्यांना दहशतवादी म्हणून उल्लेख केल्याने तिच्यावर टीका होत आहे. तसेच शेतकऱ्यांना कंगना दहशतवादी म्हणाली असून नरेंद्र मोदी सरकारसह भाजपच्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली होती. पण आता कंनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले हे सिद्ध करा, असे आव्हान दिले आहे.

नेमकी काय म्हणाली कंगना रनौत?

‘श्रीकृष्णाला ज्याप्रमाणे नारायणी सैन्य होते, त्याचप्रमाणे पप्पूची एक चंपू सैन्य आहे, ज्याला केवळ अफवांच्या आधारे कसे लढायचे हे माहित आहे. हे माझे मुख्य ट्विट आहे. यामध्ये मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले असे कोणी सिद्ध केले तर मी माफी मागून कायमसाठी ट्विटर सोडून देईन,’ असे कंगना म्हणाली आहे.

- Advertisement -

भाजपाची झांसेकी रानी शेफारली – सचिन सावंत

कंगनावर टीका करत सचिन सावंत म्हणाले होते की, ‘आता कंगना शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली. मोदी सरकार आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा आणि पाठिंब्यामुळे भाजपाची ही झांसेकी रानी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा व कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत.’

- Advertisement -


हेही वाचा – मोदींच्या मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना दिली भेट, रब्बी पिकांवरील एमएसपी वाढीस मान्यता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -