घरताज्या घडामोडीअक्षय कुमारच्या सहकलाकाराची आर्थिक परिस्थिती खालावली, आता विकतोय भाजी!

अक्षय कुमारच्या सहकलाकाराची आर्थिक परिस्थिती खालावली, आता विकतोय भाजी!

Subscribe

लॉकडाऊनच्या काही दिवस आधी जयपूरमध्ये 'सूर्यवंशी'चे शूट करून हा अभिनेता आपल्या घरी परतला होता.

कोरोना व्हायरस महामारीचा फक्त आरोग्य क्षेत्रावर नव्हे तर प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. या कोरोनाच्या भीतीबरोबरच लोकांच्या आर्थिक स्थितीवरही खूप मोठा परिणाम झाला आहे. अगदी चित्रपटसृष्टीतील लोकांवर यांचा परिणाम झाला असून याची बरीच उदाहरणे आता समोर आली आहेत. काही कलाकार अभिनय सोडून छोटे छोटे रोजगार करत आहेत तर काही जणांनी आपले जीवन संपवले आहे. यादरम्यान अजून बातमी समोर आली आहे की, ‘अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटातला एक अभिनेता बिकट आर्थिक परिस्थितीशी सामना करत आहे आणि यामुळे त्याच्यावर भाजी विकायची वेळ आली आहे.’

या अभिनेत्याचे नाव कार्तिक साहू असून तो ओडिशाचा रहिवाशी आहे. सध्या पैशांची समस्या असल्यामुळे भाजीपाला विकून तो पैसे कमवत आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊननंतर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत आता कुठे हळूहळू काम सुरू होत आहेत. कित्येक महिन्यांपासून पूर्णपणे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत काम बंद होते. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, ‘सुर्यवंशी’ चित्रपटातला हा अभिनेता ओडिशाच्या केंद्रापाडा जिल्ह्यातील आहे. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये करिअर करण्यास सुरुवात केली. बऱ्याच वर्षांपासून कार्तिकने बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचा बोडीगार्ड म्हणून काम केले आहे. अभिनेता बच्चन आणि सचिन तेंडलुकर यांच्यासह इतर सेलिब्रिटींबरोबर काम केले होते. यानंतर २०१८ पासून त्याला अनेक चित्रपटात Action सीन्सही करायला मिळाले.

- Advertisement -

अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात देखील त्याने फाइट सीक्वेंस केल्याचे सांगितले आहे. २२ मार्च रोजी लॉकडाऊनच्या काही दिवस आधी कार्तिक साहू जयपूरमध्ये फाइट सीक्वेंस पूर्ण करून ओडिशाला परतला होता. परंतु ओडिशात काही काम मिळाले नाही. त्याच्याकडे असलेले पैसे देखील संपले. त्यानंतर त्याने कुटुंब सांभाळण्यासाठी कामाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो पहिल्यांदा भुवनेश्वरला काम शोधण्यासाठी गेला होता, परंतु तिथे जाऊन काहीच निष्पन्न झाले नाही. यानंतर त्याने भाजी विकायला सुरुवात केली. कार्तिकने सांगितले की, ‘परिस्थिती सामान्य झाल्यानंतर बॉलिवडूमध्ये आपला हात आजमावले आणि तोपर्यंत इतरांप्रमाणेच जगण्यासाठी धडपडत राहीन.’

- Advertisement -

हेही वाचा – Upcoming Biopic Movies: सत्य घटनेवर आधारित ‘हे’ पाच चित्रपट येतायत भेटीला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -