घरक्रीडायुवराज म्हणतो, हा फलंदाज होता टी-२० विश्वचषक फायनलचा खरा नायक

युवराज म्हणतो, हा फलंदाज होता टी-२० विश्वचषक फायनलचा खरा नायक

Subscribe

माजी कर्णधार एम. एस.धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता. अंतिम सामन्यातील गौतम गंभीर, आरपी सिंग आणि इरफान पठाणच्या कामगिरीचं कौतुक केलं जातं. मात्र, एका खेळाडूची प्रशंसा केली जात नाही आहे, आणि तो खेळाडू आहे रोहित शर्मा. याबद्दल भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आपलं मत व्यक्त केलं आहे. २००७ च्या टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माची खेळी फारच विशेष होती, जी बहुतेक लोक विसरतात, असं युवराज सिंग म्हणाला.

२४ सप्टेंबर २००७ रोजी जोहान्सबर्ग येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. या सामन्यात गौतम गंभीरने ५४ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या. तर इरफान पठाण आणि आरपी सिंग यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले होते. स्पोर्टस्किडाशी बोलताना युवराज म्हणाला, “गौतम आणि इरफानने अंतिम सामन्यात सुंदर कामगिरी केली. म्हणून मला वाटतं की हा एक संयुक्त प्रयत्न होता. होय, मी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांविरुद्ध महत्त्वपूर्ण कामगिरी केली, ज्यामुळे आम्ही अंतिम सामन्यात मजल मारली.”

- Advertisement -

rohit sharma

मात्र, लोक अंतिम सामन्यातील रोहित शर्माच्या खेळीला विसरतात. त्याने १६ चेंडूत ३० धावा केल्या आणि यामुळे भारताची धावसंख्या १५० च्या पुढे गेली. त्याच्या खेळीत त्याने काही चौकार आणि एक षटकार लगावला होता, असं युवराज म्हणाला. “प्रत्येकजण माझ्याबद्दल आणि गौतमबद्दल बोलतात, पण रोहितच्या खेळीबद्दल कोणीही बोलत नाही,” असं युवराज म्हणाला. युवराज पुढे म्हणाला, “स्पर्धेतील हा महत्त्वाचा डाव होता. इरफानने तीन गडी बाद केले आणि तो सामनावीर ठरला, परंतु अंतिम सामन्यात रोहितची खेळी खास होती असं मला वाटतं.”

- Advertisement -

rohit and yuvraj

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -