बिपाशा पतीसोबत मालदिवमध्ये वेकेशन करतेय एन्जॉय; पाहा रोमँटिक फोटो

bollywood bipasha basu enjoy maldives vacation with husband shares romantic pictures on social media
बिपाशा पतीसोबत मालदिवमध्ये वेकेशन करतेय एन्जॉय; पाहा रोमँटिक फोटो

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू जरी लाईम लाईटपासून दूर असली तरी ती नेहमी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी बिपाशी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच बिपाशाने इन्स्टाग्रामवर पती, अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. बिपाशा आणि करण सिंग ग्रोवरचे हे फोटो चांगलेच चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

सध्या बिपाशा मालदीवमध्ये पती करण सिंग ग्रोवरसोबत वेकेशन एन्जॉय करत आहे. या मालदीव वेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ बिपाशाने शेअर केले आहेत. ज्यामध्ये बिपाशा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. तसेच बिपाशाने जे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, त्याला मंकी लव्ह असे हॅशटॅग दिले आहे. बिपाशाचे हे फोटो, व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत असून लाखोहून अधिक लोकांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

माहितीनुसार, २०१५ मध्ये ‘अलोन’ चित्रपटादरम्यान बिपाशा आणि करण सिंग ग्रोवरची ओळख झाली. ज्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले आणि २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले. बिपाशाचा जन्म दिल्लीत झाला. त्यानंतर तिचे कुटुंबिय कलकत्तामध्ये शिफ्ट झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

बिपाशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, १९९६मध्ये मॉडलिंगच्या माध्यमातून बिपाशाने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर ‘अजनबी’मध्ये २००१ साली बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी बिपाशाला बेस्ट फिमेल डेब्यूचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. बिपाशाचा ‘राज’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. बिपाशाने हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, तामिळ चित्रपटात काम केले आहे. तिचा शेवटचा चित्रपट ‘अलोन’ होता, त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसून आली नाही.


हेही वाचा – Sooryanvanshi: ‘आयला रे आयला’ म्हणतं अजय, अक्षय आणि रणवीरची धमाकेदार एन्ट्री