घरताज्या घडामोडीSooryanvanshi: 'आयला रे आयला' म्हणतं अजय, अक्षय आणि रणवीरची धमाकेदार एन्ट्री

Sooryanvanshi: ‘आयला रे आयला’ म्हणतं अजय, अक्षय आणि रणवीरची धमाकेदार एन्ट्री

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ मधील पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या गाण्याचे बोल ‘आयला रे आयला’ असे आहे. या गाण्यामध्ये सिंघम (अजय देवगण), सिंबा (रणवीर सिंग) आणि सूर्यवंशी (अक्षय कुमार) या तिघांची ग्रँड एन्ट्री दाखवली आहे. ‘आयला रे आयला’ हे गाणं पूर्ण पाहण्यासाठी चाहत्यांना आणखीन एक दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. उद्या, गुरुवारी २१ ऑक्टोबरला अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग या त्रिकुटचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दरम्यान ‘सूर्यवंशी’ चित्रपट १५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन सीईओ रविंद्र भाकड यांना दाखवण्यात आला. भाकड यांनी सूर्यवंशी पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला U/A सर्टिफिकेट मिळाले आहे. या चित्रपटातील कोणताही सीन वगळला जाणार नाही आहे. २१ ऑक्टोबरला ‘सूर्यवंशीचे’ पहिले गाणं प्रदर्शित झाल्यानंतर याचे प्रमोशनल कँपेन सुरुवात केली जाईल. तसेच २४ ऑक्टोबरला ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित केले जाऊ शकते. या गाण्यात अक्षय कुमार आणि कॅटरिना कॅफ दिसणार आहे.

- Advertisement -

‘सूर्यवंशी’ चित्रपट दिवाळीनिमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने डीसीपी वीर सूर्यवंशी आणि कॅटरीनाने आदिती सूर्यवंशी भूमिका निभावली आहे. वीर हा मुंबई दहशतवादी विरोधी पथकाचा प्रमुख दाखवला असून तो नंतर इंस्पेक्टर संग्राम भालेराव (रणवीर सिंग) आणि डीसीपी बाजीराव सिंघम (अजय देवगण) यांना ज्वॉईन करतो. मुंबईतील दहशतवादी संघटनेच्या एका हल्ला रोखण्याचा प्रयत्न करण्याचे मिशन या तिघांचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘झिम्मा’ चित्रपटातील शीर्षकगीत प्रदर्शित


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -