घरमनोरंजनह्रतिक रोशनच्या 'Krrish 4' सिनेमाबाबत राकेश रोशनचा 'मास्टर प्लॅन'; 'या' दिवशी होणार...

ह्रतिक रोशनच्या ‘Krrish 4’ सिनेमाबाबत राकेश रोशनचा ‘मास्टर प्लॅन’; ‘या’ दिवशी होणार रिलीज

Subscribe

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या सैफ अली खानसोबत आगामी विक्रम वेधाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचवेळी राकेश रोशन यांनी क्रिश फ्रँचायझीच्या सीक्वलचाही प्लॅन केला आहे. राकेश रोशनने आधीच क्रिशसाठी प्लॅनिंग सुरु केले होते. पण कोरोना आणि ह्रतिकच्या बिझी शेड्युलमुळे चित्रपटाला थोडा विलंब झाला. मात्र आता राकेश रोशन यांनी चित्रपटावर काम सुरु केला आहे. राकेश रोशन यांनी चित्रपटाच्या कास्टिंगचे काम वेगाने सुरु केले आहे.

क्रिश 4 ची तयारी आणि चित्रपटाचे कास्टिंग या वर्षी जूनमध्ये सुरु होईल, मात्र या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार हे राकेश रोशन यांनी अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्रियांका चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जातेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

- Advertisement -

हृतिक रोशन आधी त्याच्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करेल आणि या वर्षी ऑगस्टमध्ये दीपिका पदुकोणसोबत ‘फाइटर’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल. फायटरचे शूटिंग शेड्यूल 100 दिवसांचे आहे. चित्रपटाचे शूटिंग या वर्षाच्या अखेरीस संपणार आहे. 28 सप्टेंबर 2023 पर्यंत ‘फाइटर’ रिलीज करण्याचा निर्मात्यांचा प्लॅन आहे.

- Advertisement -

त्याचवेळी, ‘क्रिश 4’चे शूटिंग पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा एक सुपरहिरो चित्रपट असल्याने यात व्हीएफएक्स, अॅनिमेशन आणि अॅक्शन सीक्वेन्स असतील. त्यामुळे चित्रपटाबाबत खूप प्लानिंग करावे लागेल आणि प्रोडक्शन शेड्युलमध्ये बराच वेळ द्यावा लागेल.

क्रिश फ्रँचायझीबद्दल बोलायचे झाले तर त्याचा पहिला चित्रपट ‘कोई… मिल गया’ 2003 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत होते. हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘क्रिश’ 2006 मध्ये रिलीज झाला होता. ‘क्रिश 3’ हा 2013 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा व्यतिरिक्त कंगना रणौत देखील होती. तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -