घरताज्या घडामोडीफडणवीसांना कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी माफिया सेनेला हिशोब द्यावा लागणार -...

फडणवीसांना कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी माफिया सेनेला हिशोब द्यावा लागणार – सोमय्या

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बदली घोटाळ्या प्रकरणी चौकशी करण्यात आली. महाविकास आघाडीमधील नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहे. सूडबुद्धीने कारवाई सुरु असल्याची टीका भाजप नेत्यांकडून होत आहे. देवेंद्र फडणवीसांना , सोमय्यांना आणि विरोधकांना कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेला हिशोब द्यावा लागणार असा इशारा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बदली अहवाल लीक प्रकरणी चौकशी करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांकडून बदली अहवाल लीक झाल्या प्रकरणी चौकशी करण्यात आली. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी जेवढ्या चौकशा करायच्या असतील कराव्यात त्यांच्या डर्टी डझनवर कारवाई होणार म्हणजे होणार महाराष्ट्र घोटाळामुक्त होणार असल्याचे सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरेंना लुटण्याचा अधिकार दिलाय का? माफिया सेनाचा अधिकार दिलाय का? माफियागिरी करणार, महाराष्ट्राच्या जनतेचं रक्त पिणार आणि आम्ही शांत बसणार का? बदल्यांसाठी किती पैसे घेतले त्याचा हिशोब द्या, ठाकरे आणि पवारांनी काहीही केले तरी हिशोब द्यावा लागणार असे किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंवर सोमय्यांचा पलटवार

सूडबुद्धीने लाज नाही वाटत का? १९ बंगले अलिबागचे गेले कुठे? सूडबुद्धीने बंगले लाटले, अनिल परबने रिसॉर्ट बांधला त्याचे पैसे कुठून आले. अनिल देशमुखांनी १०० करोडची वसूली केली ही सुडबूद्धी आहे. आदित्य ठाकरेंना सांगा मणसूख हिरेनच्या बायकोला जाऊन विचार, हिरेनची हत्या ठकारे सरकारने केली आहे. सूडबुद्धीने लुटतात महाराष्ट्राला लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरेंना त्यांची इज्जत गोवा आणि उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी हातात दिली आहे. जे महाराष्ट्राला लुटतात त्याची किंमत ठाकरे सरकारला द्यावी लागणार आहे. बदलीमध्ये किती पैसे घेतले याची माहिती देण्याची हिंमत नाही ठाकरे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस असो कुणीही कितीही दबाव केला तरी सत्य बाहेर येणार आणि ठाकरे सरकारचे डर्टी डझन यांना हिशोब द्यावा लागणार असा पलटवार आदित्य ठाकरेंवर सोमय्यांनी केला.

एका पाठोपाठ सगळे घोटाळे बाहेर येत आहेत. सगळे रंगेहाथ पकडले जात आहेत. नवाब मलिक टेरर फंडिंग करतात, देशाची एकता विकण्याचा आतंकवाद्यांशी संमझोता करतात त्याला सुडबूद्धी म्हणतात की त्याला बालबुद्धी म्हणतात. मानसिकता समजू शकतो, उद्धव ठाकरे संजय राऊत, अनिल परब, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ यांची अवस्था अशी झाली आहे की, त्यांनी केलेले घोटाळे पोलिसांना, सीबीआयला, ईडीला सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस असो, किरीट सोमय्या असो यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या माफिया टोळीला हिशोब द्यावा लागणार असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पोलीस बदली प्रकरण : देवेंद्र फडणवीसांची मुंबई सायबर पोलिसांमार्फतची चौकशी २ तासांनी संपली

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -