घरमनोरंजनAsian Film Festival Barcelona 2019: मनोज बाजपेंयीच्या 'या' चित्रपटाने जिंकले दोन पुरस्कार

Asian Film Festival Barcelona 2019: मनोज बाजपेंयीच्या ‘या’ चित्रपटाने जिंकले दोन पुरस्कार

Subscribe

या चित्रपटाच्या 'उत्कृष्ट पटकथा' आणि 'उत्कृष्ट दिग्दर्शक' अशा दोन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या ‘भोंसले’ या चित्रपटाला एशियन फिल्म फेस्टिवल बार्सिलोनामध्ये दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या ‘उत्कृष्ट पटकथा’ आणि ‘उत्कृष्ट दिग्दर्शक’ अशा दोन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयी एका पोलीसाच्या भूमिका साकारली होती.

- Advertisement -

या चित्रपटाचे दिग्दर्शन देवाशीष मखीजा यांनी केले असून हा चित्रपट स्थलांतरितांच्या संघर्षावर आधारलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाला एशियन फिल्म फेस्टिवल बार्सिलोनामध्ये दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. जगभरातील महत्वाच्या असणाऱ्या मुद्द्यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. हा मुद्दा जगभरात महत्वाचा आहे, असे दिग्दर्शक देवाशीष यांनी सांगितले.

- Advertisement -

अभिनेता मनोज बाजपेयी हे उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. सत्या , गैंग्स ऑफ वासेपुर, अलीगढ़ सारख्या चित्रपटात केलेल्या अभिनयाचे कौतुक चित्रपट समीक्षकांनी केले आहे. नुकताच मनोज बाजपेयी अॅमेझोन प्राइमच्या सीरीज ‘द फैमली मॅन’मध्ये दिसले होते. या वेबसिरीजमध्ये केलेल्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे. या वेबसिरीजच्य़ा पुढच्या पार्टची देखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. याचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी मिळून केले आहे. सध्या मनोज आपल्या आगामी ‘मुंबई सागा’ या चित्रपटात व्यस्त आहे.


मानुषी छिल्लर अक्षयकुमारच्या ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -