bollywood surrogacy parents : प्रिती झिंटापूर्वी सरोगेसीद्वारे ‘हे’ सेलिब्रिटी बनले आई-वडील; शाहरुख, आमिरच्या नावाचाही समावेश

bollywood surrogacy parents amir , shahrukh, preity zinta and many bollywood stars took the support of surrogacy
bollywood surrogacy parents : प्रिती झिंटापूर्वी सरोगेसीद्वारे 'हे' सेलिब्रिटी बनले आई-वडील, शाहरुख, आमिरच्या नावाचाही समावेश

बॉलिवूडची डिंपल गर्ल अभिनेत्री प्रिती झिंटा वयाच्या ४६ व्या वर्षी दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. सरोगेसीच्या माध्यमातून प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफने दोन जुळ्या मुलांचे आई वडील होण्याचे सुखं अनुभवलं. प्रीतीन सोशल मीडियावर ही गुड न्यूज शेअर करत या जुळ्या मुलांचे नावही जाहीर केलेय. एकाचे नाव जय आणि दुसरीचं जिया. मात्र बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकारांनी सरोगेसीच्या माध्यमातून आई वडील होण्याचे सुखं अनुभवलेय. यामध्ये शाहरुख खान, अमिर खान, करण जोहर, एकता कपूर ,शिल्पा शेट्टी, तुषार कपूरसह सनी लिओनीचे देखील नाव घेतले जाते. मात्र हे सरोगेट्स पॅरंट्स म्हणजे नेमकं काय आणि किती बॉलिवूड कलाकार यामाध्यामातून आई -वडील झालेत ते आपण पाहू या.

सरोगेसीसाठी केले जाते अॅग्रीमेंट 

बॉलिवूडमध्ये सध्या सरोगेसीच्या माध्यमातून अनेक कपल मूल जन्माला देण्याचा पर्याय निवडतायत. कारण एखादं मुलं दत्तक घ्यायचं म्हटल की ती प्रक्रिया कायदेशीर असल्याने किचट आणि कठीण आहे. त्यामुळे आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सरोगेसीद्वारे आई-बाबा बनत आहेत. यातून स्वत:चे मुलं असल्याचा आनंद अनुभवता येत असल्याचा सेलिब्रिटींचे म्हणणे आहे. सरोगेसमध्ये एखादं विविहित कपल मुलाला जन्म देण्यासाठी एखाद्या महिलेचा गर्भ भाड्यानं घेऊ शकतात. जी महिला आपल्या गर्भात दुसऱ्याचं मूल वाढवते तिला सरोगेट मदर म्हणतात. सरोगेसीमध्ये महिला आणि मूलं हवं असणाऱ्या कपलमध्ये अॅग्रीमेंट केलं जातं. यानुसार ज्यांनी सरोगेसी केली आहे तेच या मुलाचे कायदेशीर आई-वडील असतात. मात्र सरोगेसीचे दुरुपयोग होऊ नये यासाठी भारतात अनेक कायदे आहेत. बॉलिवूडमध्ये असे किती सेलिब्रिटीस आहेत जे सरोगेट पॅरंट्स आहेत ते पाहू

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान दोन मुलांनंतर बॉलिवूडमधील पहिले सरोगेट्स पॅरेंट्स बनले आहे. ज्यानंतर बॉलिवूडमध्ये सरोगेसीद्वारे आई-वडील होण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला. गौरी खान आणि शाहरुख खानच्या सरोगेसीद्वारे जन्माला आलेल्या तिसऱ्या मुलाचे नाव अबराम असं आहे.

आमिर खान

यानंतर मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी देखील सरोगेसीचा पर्याय निवडला होता. आमिर आणि किरणने सरोगेसीद्वारे ५ सप्टेंबर २०११ रोजी एका मुलाला जन्म दिला. या मुलाचे नाव आजाद असून अमिर आणि किरणसाठी हे मुलं खासं आहे.

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ४४ वर्षी सरोगेसीच्या माध्यमातून मातृत्त्व सुख अनुभवलं. १५ फेब्रुवारी २०२० रोजी शिल्पाने सरोगेसीद्वारे आपल्या मुलीचा जन्म झाल्याची घोषणा केली. ‘समिषा’ असं तिच्या मुलीचे नाव आहे.

एकता कपूर

टेलिव्हिजन सीरियल क्वीन एकता कपूरने २०१९ मध्ये सरोगेसी मदरच्या माध्यमातून एका मुलांला जन्म दिला. अनेक इंटरव्हूदरम्याही ती आपल्या मुलासोबत दिसली.

तुषार कपूर

अभिनेता तुषार कपूनेही २०१७ मध्ये लग्नाआधीच सरोगेसीद्वारे एका मुलाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. तुषारने त्या मुलासह पुजा करतानाच एक फोटोही त्यावेळी शेअर केला होता ज्याची सर्वाधिक चर्चा झाली होती.

सनी लिओनी

बॉलिवूडमधील फेमस अभिनेत्री सनी लिओनी देखील २०१८ मध्ये सरोगेट्स मदरचा पर्याय निवडून दोन जुळ्या मुलांची आई झाली. सनीने अशर आणि नोआ अशा दोन सरोगेट्स मुलांच्या माध्यमातून मातृत्व अनुभवले. तिने यापूर्वी निशा नावाच्या अनाथ मुलीला देखील दत्तक घेतले आहे.

फराह खान

बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्स कोरियोग्राफर आणि डायरेक्टर फराह खान आणि तिचा पती शिरीष कुंद्रा देखील सेरोरेट्स पॅरेंट्सपैकी एक आहेत. लग्नानंतर वयाच्या ४३ व्या वर्षी फराह- शिरीष सेरोगेसीद्वारे तीन मुलांचे आई-वडील झाले.

करण जोहर

सरोगेसी पॅरेंट्सच्या लिस्टमध्ये करण जोहरचेही नाव घेतले जाते. करणने सरोगेसीद्वारे यश आणि रुही अशा दोन मुलांची जबाबदारी स्वीकारली. अनेकदा करणचे त्याच्या मुलांसोबत खेळतानाचे फोटो व्हायरल झाले आहे.

कृष्णा आणि कश्मीरा

प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा आणि कश्मीराने लग्नानंतर जवळपास ६ वर्षांनंतर सरोगेसीद्वारे आई -वडील होणे पसंत केले. सरोगेसीद्वारे आई-वडील होण्याचे सुख अनुभवता आल्याने देखही स्वत:ला भाग्यशाली समजत आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये सरोगेसीव्दारे आई-बाबा होण्याचा हा ट्रेंड प्रचंड वाढत आहे. यामागे फिटनेस आणि बिझी शेड्यूल अशी कारण सांगितली जात आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये या ट्रेंडची क्रेझ सर्वाधिक वाढतेय असे म्हटले जातेय. त्यामुळे प्रिती झिंटा देखील आता या ट्रेंडचा भाग झाली आहे.