घरमनोरंजनकतरिना कैफ आणि विक्की कौशलला धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात

कतरिना कैफ आणि विक्की कौशलला धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

मुंबई पोलिसांनी एका संशयीत व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. या आरोपीचं नाव मनविंदर सिंह असून तो उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील राहणारा आहे.

बॉलिवूडमधील स्टार कपल विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. ज्यानंतर विक्का कौशलने सांताक्रूझ पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीं विरोधात तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती कतरिनालाला खूप दिवसांपासून सोशल मीडियावर स्टॉक करत होता. तसेच त्याने सोशल मीड्याच्या माध्यमातून कतरिना कैफला आणि विक्की कौशलला जीवे मारण्याची धमकी दिली होती. विक्कीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच पोलिसांनी आता तपास सुरू केला. दरम्यान, आता मुंबई पोलिसांनी एका संशयीत व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. या आरोपीचं नाव मनविंदर सिंह असून तो उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील राहणारा आहे.

मुंबई पोलिसांची साइबर शाखेने या आरोपीची ओळख काढली आहे. हा आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफला सोशल मीडियावर स्टॉक करत होता,तसेच तिच्या फोटोंवर अश्लील कमेंट देखील करत होता. पोलिसांनी या आरोपी विरोधात भारतीय ५०६ आणि ३५४ डी याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आईटी अॅक्ट ६७ (अश्लील फोटो, व्हिडीओ आणि कमेंट करणे) याअंतर्गत देखील आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी सांगितलं की, आरोपी कतरिना कैफला इंस्टाग्रामवर स्टॉक करत होता आणि त्याने इंस्टाग्रामवर कतरिनाला जिवे मारण्याच्या धमकीचे मॅसेजही पाठवले होते. यासंदर्भात विक्की कौशलने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.


हेही वाचा :सलमान खाननंतर कतरिना आणि विक्कीला मिळाली ठार मारण्याची धमकी; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -