छोटू भैयाला फक्त बॅट, बॉल खेळायला हवं…उर्वशी रौतेलाचं ऋषभ पंतच्या पोस्टवर सडेतोड उत्तर

ऋषभ पंतने त्याच्या सोशल मीडियावर उर्वशीबाबत एक पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टचं उत्तर देत उर्वशी रौतेलाने देखील तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. उर्वशीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतमुळे चर्चेत आली आहे. दोघांमधीलर वाढत चालला आहे. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांचं नाव न घेता एकमेकांवर टीका करत आहेत. ऋषभ पंतने त्याच्या सोशल मीडियावर उर्वशीबाबत एक पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टचं उत्तर देत उर्वशी रौतेलाने देखील तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. उर्वशीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

उर्वशीने दिलं ऋषभ पंतला उत्तर


उर्वशीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटर ऋषभ पंतबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिलंय की, “छोटू भैयाला फक्त बॅट बॉल खेळायला हवं. मी मुन्नी नाही जी बदनाम होईल, ते पण कोणत्यातरी किड्डो डार्लिंगसाठी.” यासोबतचं उर्वशीने काही हॅशटॅग देत रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. छोटू भैया. कोणत्याही शांत मुलीचा गैरफायदा घेऊ नये. असं लिहिलं आहे. उर्वशीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टवर देखील अनेक नेटकरी कमेंट्स करत आहेत.

ऋषभ पंतने केली होती ही पोस्ट


खरंतर, या सर्व प्रकरणाची सुरूवात ऋषभ पंतच्या एका पोस्टमुळे झाली होती. दरम्यान, ही पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच त्याने ती डिलीट केली होती. परंतु तोपर्यंत त्याच्या पोस्टचे स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याने त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, हे खूप मजेशीर आहे की लोक इंटरव्यूमध्ये खोटं बोलतात कारण, त्यांना लोकप्रिय व्हायचं असतं आणि हेडलाईन मिळवायची असते. काही लोक प्रसिद्ध होण्यासाठी भुकेले असतात. देव त्यांचं भलं करो. माझा पिच्छा सोड ताई खोटं बोलायची पण मर्यादा असते. या पोस्टनंतरच उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.


हेही वाचा :लोकप्रिय संगीतकार अजय-अतुल खेळणार ‘कोण होणार करोडपती’चा खेळ!