घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकाँग्रेसकडून आझादी गौरव पदयात्रा

काँग्रेसकडून आझादी गौरव पदयात्रा

Subscribe

नाशिक : भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पंचवटी परिसरातून आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. पंचवटी कारंजा येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व स्वातंत्र्य सैनिक कै. रामचंद्र पांडे, कै. सदूभाऊ भोरे, कै. बाबूराव आटवणे यांना अभिवादन करून या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

पंचवटी कारंजा येथून गजानन चौक, नागचौक, सेवाकुंज, निमाणीमार्गे पेठरोड, फुलेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे पदयात्रा दत्तनगर, मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका, मालेगाव स्टँडमार्गे गोदाघाटावर समारोप करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यात प्रयत्न करत आहे. वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त असून, देशांतील लोकशाही संपुष्टात आणली जात आहे. देश वाचवण्यासाठी काँग्रेस देशभरात प्रत्येक जिल्ह्यातील ब्लॉकमध्ये आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील, उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत, पंचवटी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष उद्धव पवार, महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वाती जाधव, पंचवटी महिला ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष कल्पना पांडे, प्रदेश सरचिणीस अनिल कोठुळे, सेवा दलाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण धोत्रे, सरचिटणीस राजकुमार जेफ, अनिल बहोत, स्वप्नील पाटील, अरुण दोंदे, दिनेश उन्हवणे, सुरेश मारू, बबलू खैरे, सोमनाथ मोहिते, विजय जाधव, अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -