घरमनोरंजनबाळूमामाच्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद

बाळूमामाच्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद

Subscribe

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिके विषयी समर्थ पाटीलशी बोलताना त्याने अनेक अनुभवांचा उलगडा केला.

कलर्स मराठी वाहिनीवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका येत असतात. त्यामधील एक म्हणजे ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका आहे. ही मालिका अलिकडेच सुरु झाली आहे आणि कमी वेळातच ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच संत बाळूमामा यांचे जीवनकार्य प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. या मालिकेत समर्थ पाटीलने बाळूमामाची भूमिका साकारली आहे आणि या भूमिकेमुळे तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. अखंड महाराष्ट्रातून समर्थला भरभरून प्रेम मिळत आहे.

पाहा काय म्हणतायत तुमचे बाळूमामा!

बाळूमामांची भूमिका मला साकारायची संधी मिळत आहे हे मला समजले आणि अदमापूर ते मुंबई हा प्रवास सुरु झाला. माझ्यावर बाळूमामांचीच कृपा आहे. त्यामुळे हा प्रवास आनंददायी आणि अविस्मरणीय झाला आहे. सुरुवातीला खूपच दडपण आले होते. पण हळूहळू सोपे होत गेले कारण मी अदमापुरचा असल्याने मला बाळूमामा कोण आहेत? त्यांनी काय कार्य केले आहे? याची कल्पना होती. पण पहिल्यांदा माझे वडील याच्या विरोधात होते. मात्र, आता त्यांना माझं काम आवडू लागलं आहे. त्यामुळे त्यांचा विरोधही नाहीसा झाला. प्रेक्षक मला आता बाळूमामा म्हणूनच ओळखू लागले आहेत. कुठेही बाहेर गेलो की, प्रेक्षक आवर्जून मालिका बघतो, काम आवडतं अशा मनाला भावणाऱ्या प्रतिक्रिया देतात. माझा अभिनय प्रेक्षकांना एवढा आवडेल यावर विश्वासच बसत नव्हता. पण मालिकेत काम करण्याची संधी मिळाली त्यासाठी मी आनंदी आहे.

- Advertisement -

‘घरात बाळूमामा म्हणून माझाच फोटो’

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचं प्रमोशन करताना येणऱ्या अनुभवाबद्दल बोलताना समर्थने सांगितले की, एक असा किस्सा घडला होता. आम्ही एका गावात गेलो असताना तिथले लोकं तुम्ही बाळूमामाची भूमिका करत नाही तुम्ही साक्षात बाळूमामाच आहात असे म्हणाले. दुसरा किस्सा असा सांगितल की, एक असं गाव आहे जिथे २३ हजार लोक आहेत. त्यांच्या घरात बाळूमामा म्हणून माझा फोटो लावला आहे. तसेच माझ्या वाढदिवसाला मला भेटण्यासाठी एक ट्रक भरून लोकं आली होती जे मी कधीच विसरणार नाही. आता जेव्हा मी गावी जातो तेव्हा लोकांच्या नजरेत खूप आदर अभिमान असतो. जी लोकं भांडायची, बोलायची नाही तीच आता स्वत:हून बोलायला येतात. असे खूप वेगवेगळे अनुभव येत असतात. आपल्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं त्यासाठी समर्थने यावेळी बोलताना आभार व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -