Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Corona viras:अभिनेता कुमुद मिश्रा यांना कोरोनाची लागण,उपचाराकरिता रुग्णालयात दाखल

Corona viras:अभिनेता कुमुद मिश्रा यांना कोरोनाची लागण,उपचाराकरिता रुग्णालयात दाखल

मध्य प्रदेश मधील रीवा येथील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे. कुमुद मिश्रा यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये कोरोना व्हायरसची लाट येऊन वर्ष पालटले असेल तरी परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच दिसत आहे. लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढण्याबरोबरच आपुर्‍य सोयी अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. बॉलिवूड मधेही कोरोनाचा विळखा जलद गतीने वाढत आहे. अभिनेता कुमुद मिश्रा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्या कारणामुळे त्यांनी ताबडतोब रुग्णालयात धाव घेतली. मध्य प्रदेश मधील रीवा येथील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे. कुमुद मिश्रा यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत तसेच त्यांना ऑक्सिजन देण्यात येत असून त्यांची प्रकृतीत सुधारणा होत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या संपर्कात असल्यामुळे कुमुद यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मिळाली आहे.
अभिनेत्री पुजा हेगडे हिचा सुद्धा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती पुजाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सध्या पुजा होम क्वारंटाईन असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करत आहेत आहे.
बॉलिवूड मध्ये कोरोनाचा विळखा वेगाने वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार,कार्तिक आर्यन,विकी कौशल ,आलिया भट्ट,रणबीर कपूर,मनोज बाजपेयी यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. वेळीच योग्य उपचार केल्यानंतर त्यांची कोरना चाचणी नेगेटिव्ह आली.


हे हि वाचा – मालदीवच्या रोमॅंटिक व्हॅकेशनहून परतले रणबीर आलिया

- Advertisement -