माध्यमांनी संवेदनशील राहावं; अर्जुन कपूरचं आवाहन

coronavirus effect arjun kapoor rebuked paparazzi said be sensitive and sensible
माध्यमांनी संवेदनशील राहावं; अर्जुन कपूरचं आवाहन

संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे चिंताग्रस्त आहे. भारतातही दिवसेंदिवस करोनग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राजकारण्यापासून ते बॉलिवूड कलाकारमंडळी वेगवेगळ्या मार्गांनी लोकांमध्ये जागरुकता पसरवत आहेत. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून करोनापासून वाचण्यासाठी सल्ला दिला आहे. आलिया भट्ट ते दीपिका पदुकोणसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरून माहितीपूर्ण पोस्ट्स शेअर केली आहे. मात्र यावेळी अर्जुन कपूरने असं काहीतरी पोस्ट केलं आहे ज्यामुळे मीडियाच्या फोटोग्राफरच्या पापराझीला फटकारले आहे. तसंच त्यानं माध्यमांना आवाहन देखील केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने असं लिहिलं आहे की, ‘मी नेहमीच्या तपासणीसाठी माझ्या डॉक्टरांकडे गेलो होतो. पण परत येताना मला दिसलं की, काही पापाराझी हे माझ्या गाडीजवळ माझे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी उभे होते. मला माझे काम आवडते आणि माध्यम माझी दखल घेत हे देखील बरं आहे. परंतु अशा परिस्थिती हे करणं योग्य नाही आहे. माझी माध्यमांच्या लोकांना विनंती आहे की, काही काळ संवेदनशील आणि समजूदार रहावे. पुढच्या आनंद घेण्यासाठी थोडं अंतर ठेवणं चांगलं असतं. निरोगी राहा आणि घरी राहा.’

करोना व्हायरसच्या प्रसारामुळे अर्जुन आणि परिणीती चोप्राचा आगामी चित्रपट ‘संदीप और पिंकी फरार’ याची प्रदर्शित तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार होता.


हेही वाचा – करोना व्हायरसपासून बचाव करण्याकरिता लतादीदींच जुन गाणं व्हायरल