Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Covid-19 मुळे मराठी कलाविश्वाला ब्रेक, गेल्या वर्षभरात ७० ते ९० चित्रपट टांगणीला

Covid-19 मुळे मराठी कलाविश्वाला ब्रेक, गेल्या वर्षभरात ७० ते ९० चित्रपट टांगणीला

मराठी मध्ये दरवर्षी जवळपास १०० चित्रपट प्रदर्शित होतात. या सगळ्यांना ब्रेक तर लागला आहेच, पण कोरोनामुळे आर्थिक चक्र मंदावल्यामुळे अनेकांनी चित्रपट निर्मितीचा विचार काढून टाकला आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोनाने गेली वर्षभर संपूर्ण जगाला सासुरवास केला आहे. या कोविडने सगळ्यांना घरात बसवले. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च २०२० मध्ये पहिले लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर पुढचे काही महिने संपूर्ण देश घरात होता. याचा सर्वात मोठा फटका हा कलाविश्वाला बसला होता. चित्रीकरणावरील बंदी, चित्रपटगृहांवरील बंदी असल्याने अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर गेले होते. कालांतराने अनलॉकिंगची प्रक्रिया सुरु झाली मात्र थिएटर्स बंद होती. या सगळ्याचा परिणाम मराठी चित्रपट निर्मितीवरही झाला आहे. मराठी मध्ये दरवर्षी जवळपास १०० चित्रपट प्रदर्शित होतात. या सगळ्यांना ब्रेक तर लागला आहेच, पण कोरोनामुळे आर्थिक चक्र मंदावल्यामुळे अनेकांनी चित्रपट निर्मितीचा विचार काढून टाकला आहे. चित्रपट निर्मात्यांचे या लॉकडाऊन अभावी खूप नुकसान झाले आहे.

सिनेसृष्टीतील काही निर्मात्यांनी याविषयी आपले मत मांडले आहे. गेल्या वर्षीचेच चित्रपट अद्याप प्रदर्शित झाले नाहीत, त्याची वाट प्रत्येकजण पाहत आहेत. यामध्ये अनेक मोठ्या सिनेमांचा समावेश आहे. काही सिनेमे पूर्ण आहेत, तर काहीची छोटी-छोटी कामे राहिली आहे. सिनेमे करायचे असतात पण आता शक्य होत नाही. असे निर्मात्यांना वाटते. काहींनी तर नोटबंदीनंतरच याला ब्रेक लागला आणि कोरोनाने आणखी परिस्थिती आवळली आहे. असे देखील म्हणाले आहेत. कोरोना येण्याआधीच किमान ६० ते ७० सिनेमे वर्षानुवर्षे अडकून आहेत. काही फायनान्सर गळले, तर काहींचे पैसेच संपले. कित्येक सिनेमे ८ ते ९ वर्षे पडून आहेत. मराठी सिनेमांवरचा हा ब्रेक वाढणार आहे. कारण अनेक सिनेमांची गेल्या वर्षी राहिलेली कामे यंदा उरकण्याचा चंग बांधला होता. पण आता पुन्हा लॉकडाऊन आल्याने चित्रीकरणावर बंदी आली आणि हा ब्रेक वाढला. हीच परिस्थिती २०२२ मध्येही असणार असल्याचा अंदाजही काही निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. तर काहींनी हिंदीचीही स्पर्धा असल्याची भीती व्यक्त केली आहे. कारण उद्या परिस्थिती बदल्यावर हिंदीवालेही स्पर्धेत येतील. मात्र अशावेळी मराठी सिनेमांना टिकून राहावं लागणार आहे. सध्या अडकलेले १०० सिनेमे २०२२ मध्ये तरी सुटतील अशी आशा काही निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.


- Advertisement -

हे वाचा-  Amazone prime video:’मुंबई सागा’ अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर जाहीर !

- Advertisement -