घरमनोरंजन‘शक्तिमान’ सोशल मीडियावर होतोय ट्रोल! ‘Me Too’ संबंधित वक्तव्यानंतर नेटकरी संतप्त

‘शक्तिमान’ सोशल मीडियावर होतोय ट्रोल! ‘Me Too’ संबंधित वक्तव्यानंतर नेटकरी संतप्त

Subscribe

सोशल मीडियावर फॅन्सनी शक्तिमान अर्थात मुकेश खन्नांवर केला टीकेचा भडिमार

टीव्हीवरचा लाडका ‘शक्तिमान’, ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना हे सध्या वादग्रस्त वक्तव्यामुळं चांगलेच ट्रोल होत आहेत. सध्या मुकेश खन्ना हे प्रत्येक ट्रेंडिंग विषयावर आपलं मत व्हिडिओद्वारे व्यक्त करत असतात. नुकतंच त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’ शर्माच्या शोवर टीका केली होती. त्यानंतर त्यांचा एक #MeToo मोहिमेवर मत व्यक्त करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी वर्किंग वुमेन अर्थात काम करणाऱ्या महिलांबाबत वक्तव्य केलं आहे. यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियात जोरदार टीका होत आहे. त्यांना काही यूझर्सनी शक्तिमान नसून किलविश असल्याचं म्हटलं आहे. ‘मी टू’ प्रकरणावर भाष्य करताना अभिनेते मुकेश खन्ना यांनी महिलांनाच चुकीचे ठरवले आहे.

ते म्हणाले, ‘महिलांचे काम केवळ घर सांभाळणे होते. महिलांनी घराबाहेर पडून काम करायला सुरुवात केल्यावर हे ‘मी टू’ सारखे प्रकार घडायला लागले. आज स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालण्याची वार्ता करतात तसेच ते म्हणतात की, मी टू चा प्रॉब्लेम त्याचवेळी सुरु झाला ज्यावेळी महिला घराच्या बाहेर पडू लागल्या. महिला पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करु इच्छितात, मात्र त्या याचा विचार करत नाहीत की यामुळं त्य़ांच्या मुलांना काय काय सहन करावं लागतं. मुलं आयासोबत राहतात. आणि मग त्यांच्यासोबत ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी’ सारख्या सिरियल्स पाहतात’. त्यांच्या याच वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

मुकेश खन्नांवर संतापले नेटकरी

‘अशा घृणास्पद टिप्पणी मी आज पर्यंत कधीच ऐकली नाही. तुम्ही तुमच्याबद्दल असलेला सगळा सन्मान घालवून बसलात,’ असे म्हणत एका वापरकर्त्याने त्यांच्याबद्दलचा राग व्यक्त केला.

- Advertisement -

यासह मुकेश खन्नांच्या या वक्तव्यानंतर नोकरी करणाऱ्या महिलांनी आपली नाराजी वक्त केली आहे. यावर एका वापरकर्त्याने कमेंट केली की, ‘आणि याच प्रकारे या मूर्ख शक्तिमानने आपले समाजातील स्थान बळकट करायचा प्रयत्न केला. ते नेमके कोणत्या प्रकारच्या कुटुंबात वाढले असतील, याचे आश्चर्य वाटते. त्यांना कोणीतरी विचारा की ५-६ वर्षांच्या लहान मुलींवर का बलात्कार होतात? स्त्री शक्तीला घाबरणाऱ्या या कमजोर पुरुषांना कुठलाही मंच मिळता कामा नये,’ असे म्हणत आपला रोष व्यक्त केला.

मुकेश खन्ना होत आहेत ट्रोल

व्हिडिओत मुकेश खन्ना म्हणतात की, मर्द, मर्द असतो आणि महिला या महिला. यानंतर मुकेश खन्ना जोरदार ट्रोल होत आहेत. सोशल मीडियावर फॅन्सनी शक्तिमान अर्थात मुकेश खन्नांवर टीकेचा भडिमार केला आहे. काही चाहत्यांनी मुकेश खन्ना हे शक्तिमान नसून तमराज किलविश आहेत. तर अनेकांनी त्यांच्या सिरियल्स बायकॉट करण्याची मागणी केली आहे. यावर मुकेश खन्ना यांनी काही स्पष्टीकरण अद्याप दिलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -