घरमनोरंजनViral Video: गर्दीत फसलेल्या दीपिकाला चाहत्यांकडून धकाबुक्की; हातातून पर्सही खेचली

Viral Video: गर्दीत फसलेल्या दीपिकाला चाहत्यांकडून धकाबुक्की; हातातून पर्सही खेचली

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण गुरूवारी रात्री गर्दीत अशा प्रकारे फसली की तिला तिथून बाहेर पडणं कठीण झालं. चाहत्यांच्या गर्दीतून वाट शोधत असताना अक्षरशः तिच्या नाकीनऊ आले. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या चाहत्यांकडून मिळणारे प्रेम आणि त्यांची होणारी गर्दी काही नवी नाही. मात्र कित्येकदा चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांना जवळून पाहण्यासाठी त्यांच्या सभोवती गर्दी करतात. परंतु, यावेळी घडलेला प्रकार काहिसा वेगळाच होता. चाहत्यांच्या गर्दीने दीपिकाला घेरलेच नाही तर तिला धक्काबुक्की देखील केली. तर यावेळी तिची पर्स देखील हिसकवल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

असे सांगितले जाते की, दीपिका एका रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणासाठी पोहोचली होती. तिथेच रेस्टॉरंटजवळ चाहत्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली. रात्रीचे जेवण करुन रेस्टॉरंट बाहेर येताच तिला तिच्या चाहत्यांनी घेरलं. यावेळी उपस्थित चाहत्यांचे प्रेम पाहून ती हैरान झाली. हे पाहून दीपिका काहिशी घाबरलेल्या अवस्थेत असताना तिने स्वतःची कशीबशी सुटका करत कारकडे जाण्याचा प्रयत्न करू लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

- Advertisement -

यावेळी दीपिकाला रेस्टॉरंटबाहेर येताना पाहून फॅन्स, पापाराझी यांच्यासोबत टीशू विकणाऱ्या काही महिला सुद्धा तिथे पोहोचल्या आणि दीपिकाला टीशू खरेदी करण्यासाठी आग्रह करून तिच्या अगदी मागे पडल्यात. या गर्दीतून दीपिकाला वाचवण्यासाठी तिचे सिक्युरिटी गार्डस पुढे आले त्यावेळी झालेल्या गर्दीत कोणी तरी तिची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तिचे सिक्युरिटी गार्ड तिच्या सोबत असताना गर्दीला आवरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, लवकरच दीपिका ’83’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय शकुन बत्राच्या एका चित्रपटात ती झळकणार असून त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. यात तिच्यासोबत अनन्या पांडे व सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत असल्याची माहिती मिळतेय.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -