दीपिकाने आपल्या आगामी चित्रपटात अॅसीड हल्ला बळीत मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. अॅसीड हल्ल्याला बळी पडलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे.‘छपाक’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचं शुटींग नुकतच संपलं आहे. चाकोरीबाहेरची दिग्दर्शिका म्हणून ओळख असणाऱ्या मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मेघना गुलजार यांनी शुटींगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर केले आहेत. यात त्यात खूप भावूक झालेल्या दिसल्या.
या चित्रपटाच्या शुटींगच्या शेवटच्या दिवशी मेघना गुलजार यांनी सगळ्यांना मिळी मारून फोटो काढले. चित्रपटात प्रमुख भुमिकेत असणाऱ्या दीपिका आणि विक्रांतसोबत फोटो काढताना मेघना खूप भावुक झाल्या.
फोटोसोबतच ‘..आणि शूटिंग संपले आहे. मालती ..अमोल .. मी कायमच तुम्हाला आठवणीत ठेवेन. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल थँक्यू.’ असेही त्यांनी लिहिले आहे.
मालती असे भूमिकेचे नाव
चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये दीपिका लक्ष्मी अग्रवाल सारखी हुबेहूब दिसत आहे. या चित्रपटातील दीपिका साकारणाऱ्या भूमिकेच्या डोळ्यात एक प्रकारची जिद्द दिसत असून संपूर्ण चित्रपटात दीपिका साकारत असलेल्या त्या व्यक्तिरेखेत दिसत आहे. मेघना गुलजारने सलग तीन गंभीर विषयावरील चित्रपट केल्यानंतर एक हलका-फुलका चित्रपट करण्याची ईच्छा होती. परंतु अॅसिड हल्ल्यासारख्या गंभीर विषयाचा चित्रपट असल्याने ‘छपाक’ हा चित्रपट मेघना गुलजारांकडे आला. ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका साकारत असलेल्या भूमिकेचे नाव मालती असून या चित्रपटाची निर्मिती दीपिका करत आहे.
२०२० मध्ये होणार प्रदर्शित
या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पदुकोणच्या ए एंटरटेनमेंटची सुरूवात होणार आहे. फॉक्स स्टार स्टूडियोच्या ए एंटरटेनमेंट आणि मृग फिल्म एकत्रितरित्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तिच्यासोबत चित्रपटात विक्रांत मैसी दिसणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.