घरताज्या घडामोडी'आयुष्यातील पहिलं बक्षीस घ्यायला माझ्याकडे पैसेच नव्हते'- कंगना

‘आयुष्यातील पहिलं बक्षीस घ्यायला माझ्याकडे पैसेच नव्हते’- कंगना

Subscribe

बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत ही कायम तीच्या चित्रपटां ऐवढीच तीने केलेल्या कॉन्ट्रव्हर्सीमुळे प्रसिध्द होते. कंगना तीच्या स्टेटमेंटमुळेही कायम चर्चेत असते. नुकतेच कंगनाने बॉलिवूडमध्ये आपली १४ वर्ष पुर्ण केली आहेत. कंगनाने गँगस्टर या चित्रपटातून २००६ ला बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तीने कधी मागे वळून पाहिलच नाही.

- Advertisement -

कंगनाने वयाच्या १७ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये कामाला सुरूवात केली. आणि तीचा पहिला चित्रपट गँगस्टर रिलीज झाला तेव्हा ती केवळ १८ वर्षाची होती. बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पुर्ण झाल्यानंतर कंगना म्हणाली की, गँगस्टर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीसाठी मला नॉमिनेट करण्यात आलं होतं. पुरस्कार घेण्यासाठी तीला सिंगापूरला जावं लागणार होतं. मात्र त्यावेळी सिंगापूरच्या तिकीटा ऐवढेही पैसे नव्हते.

- Advertisement -

यापुढे बोलताना ती म्हणाली, मला अजिबात माहिती नव्हतं, की मला नॉमिनेशन मिळालं आहे. जेव्हा चित्रपटाची संपूर्ण टीम सिंगापूरला निघाली तेव्हा त्यांनी मला माझा ट्रॅव्हल प्लॅन विचारला. त्यावेळी मला माहितीच नव्हतं. सिंगापूरला कसं जातात. यावेळी चित्रपटाच्या क्रूला तिकीटाचे पैसे विचारताना मला फार लाज वाटली होती. त्यामुळे ती संधी माझ्या हातून गेली होती. त्यावेळी माझी ट्रॉफी चित्रपटाचे डीओपी बॉबी सिंह यांना बोलवून देण्यात आली. पण त्या दिवशी माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस माझ्यासाठी होता.

लवकरच कंगनाचा थलाय़वा हा चित्रपटा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारीत आहे. याचबरोबर धाकड, तेजस असे चित्रपट कंगनाचे प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहेत.


हे ही वाचा – बिग बॉस २ च्या विजेत्यानं लॉकडाऊनमुळे घराच्या गच्चीवर उरकलं लग्न!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -