घरमनोरंजनमी कोणत्याही पक्षाचा भाग नाही, राष्ट्रवादासाठी प्रचार करेन, कंगनाच नवं विधान

मी कोणत्याही पक्षाचा भाग नाही, राष्ट्रवादासाठी प्रचार करेन, कंगनाच नवं विधान

Subscribe

बॉलिवूडची बिनधास्त गर्ल अभिनेत्री कंगना रनौत तिच्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त राजकीय विधानांमुळे सर्वाधिक ओळखली जाते. अलीकडेच स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे कंगाना सर्वाधिक चर्चेत होती. बहुतेक वेळा भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ बोलणारी कंगना अचानक आत्ता मी स्वत: कोणत्याही पक्षाचा भाग नसल्याचे म्हणू लागली आहे. शनिवारी एका कार्यक्रमात कंगनाने सांगितले की, मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मात्र राष्ट्रवादासाठी लढणाऱ्या लोकांचा प्रचार मी नक्की करणार असे तिने जाहीर केले.

कंगना रनौत शनिवारी मथुरा-वृंदावनला पोहोचली होती. यावेळी कंगनाने श्रीकृष्ण जन्मस्थळाला भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी तिला २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार का असा प्रश्न विचारला. यावर कंगना उत्तर देत म्हणाली की, ‘मी कोणत्याही पक्षाचा भाग नाही. जे राष्ट्रवादासाठी काम करतील त्यांचा मी प्रचार करेन.

- Advertisement -

यावर पुढे कंगना म्हणाली की, मला आशा आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री लोकांना श्रीकृष्णाचे ‘खरे’ जन्मस्थान पाहता येईल यासाठी प्रयत्न करतील. यावर कंगनाने दावा केला की, भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तिथे एक ईदगाह तयार करण्यात आला आहे.

जे शूर, प्रामाणिक, राष्ट्रवादी आणि देशासाठी बोलतात त्यांना कळेल की ते जे बोलत आहे ते खरे आहे, असेही कंगना रणौतने यावेळी सांगितले. नुकतेच चंदीगडमध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी निषेध म्हणून कंगनाची गाडी अडवली होती, ज्यावर ती म्हणाली, ‘मी कधीही माफी मागणार नाही. मी नेहमीच निषेध करेन.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -