ही अभिनेत्री साकारणार ‘डॉ. आनंदीबाई जोशी’ यांची भूमिका

आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित 'आनंदी गोपळ' हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बालक पालक’ या चित्रपटातील गोड अशी अभिनेत्री डॉ. आनंदीबाई जोशी यांची भूमिका साकारणार आहे.

Dr. anandibai joshi charachter will be played by this actress
‘आनंदी गोपाळ’ चित्रपट

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून डॉ. आनंदीबाई जोशी यांच नाव आदराने घेतलं जातं. या आनंदीबाईंच्या जीवनावर ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंदीबाईंच्या या जीवनसंघर्षावर आधारीत बायोपिकमध्ये अभिनेता ललित प्रभाकर गोपाळ जोशी यांच्या मुख्य भूमिकेत आहे. तर आनंदीबाईंच्या भूमिकेत कोण दिसणार? याची उत्सुकता चित्रपटाचा पहिला टीझर आल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये होती.

ही अभिनेत्री साकारणार आनंदीबाईंची भुमिका

अखेर आनंदीबाईंची भूमिका कोण साकारणार? हे नाव पुढे आलं आहे. अभिनेत्री भाग्यश्री मिलींद आनंदीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘बालक पालक’ या चित्रपटात भाग्यश्री होती. बालक पालकमधील भुमिकेनंतर आनंदीबाईं यांच्यासारखी मोठ्या व्यक्तीमत्त्वाची भुमिका भाग्यश्री कशी साकारणार? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. आनंदीबाईंचा हा प्रवास १५ फेब्रुवारीला उलगडणार आहे.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला

ज्या काळात स्त्रीला समाजात तितकंसं महत्त्व दिलं जात नव्हतं. महिलांना फक्त चूल – मूल एवढ्यापुरतंच मर्यादित रहावं लागत होतं. मात्र या काळात स्त्रियांनी समाजाविरोधात यशस्वी लढा देत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. यातील एक स्त्री म्हणजे आनंदीबाई जोशी. प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. मात्र आनंदीबाई जोशी यांच्या मागे त्यांचे पती गोपाळ जोशी ठामपणे उभे होते. आनंदीबाईंनी वयाच्या अठराव्या वर्षी बोटीने परदेशी प्रवास केला आणि आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. त्या पहिल्या परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

गोपाळरावांची भूमिका ललित प्रभाकर साकारणार

आनंदीबाई म्हणजे महारष्ट्रानं देशातल्या प्रत्येक महिलेला दिलेली देणगी आहे. तसेच आनंदीबाईंचा हा प्रवास पडद्यावर लवकरच येणार असून या चित्रपटात गोपाळरावांची भूमिका ललित प्रभाकर साकारणार आहेत.

Anandi Reveal Motion Poster | Anandi Gopal | 15 February 2019

१३२ वर्षांनंतर पुन्हा येतायत डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी.'आनंदी गोपाळ' मध्ये आनंदीबाई च्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंद. #AnandiGopal Releasing on #15FebruaryDirected by Sameer Sanjay VidwansProduced by #ZeeStudiosMarathi Fresh Lime Films Namah Pictures Lalit Prabhakar Official #BhagyashreeMilind Mangesh Kulkarni Ashwin Patil

Posted by Zee Studios on Monday, January 21, 2019