घरमनोरंजन'तारक मेहता' मालिकेतील 'हाथी'चं निधन

‘तारक मेहता’ मालिकेतील ‘हाथी’चं निधन

Subscribe

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील हंसराजची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली. याच हंसराज ऊर्फ कवी कुमार आझादचं निधन झालं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या दहा वर्षांपासून ही मालिका चालू असून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. या मालिकेतील हंसराज हाथी अर्थात कवी कुमार आजाद यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं सोमवारी मीरा रोड येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. कवी कुमार आजाद अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर भूमिका करत आहेत. मात्र ‘हंसराज हाथी’ या भूमिकेमुळं त्यांना एक कायमस्वरूपी ओळख मिळवून दिली.

हंसराज हाथीच्या भूमिकेनं दिली ओळख

कवी कुमार आझाद यांची ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील हंसराजची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली. सतत खाणारा आणि तितकाच लोकांची काळजी करणारा डॉक्टर गेले दहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. त्याच्या निधनानं मालिकेमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. कवी कुमार आझादच्या निधनाची ही बातमी आरजे आलोक यानं आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. ‘महाराष्ट्रातील मीरा रोडमधील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यानं डॉ. हंसराज हाथी यांचं निधन झालं आहे. तुझ्या आत्म्यास शांती मिळो, मित्रा’ अशा तऱ्हेचं ट्विट आलोकनं केलं आहे. कवी कुमार आझादनं यापूर्वी अनेक मालिकांमधून तर काम केलंच मात्र, आमिर खानच्या ‘मेला’ आणि परेश रावलच्या ‘फंटूश’ या चित्रपटातदेखील त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -