घरमनोरंजनअनिल - सोनमच्या चित्रपटाचा टिजर रिलीज

अनिल – सोनमच्या चित्रपटाचा टिजर रिलीज

Subscribe

अनिल कपूर आणि सोनम यांच्या एक लडकी को देखा तो ऐसा लगा चित्रपटाचे टिजर रिलीज झाले असून यामुळे १९४२ अ लव स्टोरीच्या चित्रपटाची आठवण प्रेक्षकांना होत आहे. या आगामी चित्रपटातून अनिल-सोनमची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

बॉलीवूडमध्ये एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी एकत्र काम करणं हे काही नवीन नाही. मात्र एखादी जोडी पहिल्यांदा एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असेल तर त्याची चर्चा नक्कीच होते. सिनेसृष्टीतील कपूर खानदानातील बापलेकीची जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ही जोडी आहे अनिल कपूर आणि त्याची लाडकी कन्या सोनमची. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपटात सोनम आणि अनिल कपूर एकत्र काम करत असून २०१८ च्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिजर सध्या सोशल मीडियावर प्रदर्शीत झाला आहे.

- Advertisement -

सोनमचा सिंपल लुक

चित्रपटात जुही चावला आणि राजकुमार रावदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार असून विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर शेली चोप्रा धर हिने याचे दिग्दर्शन केले आहे. सोनमने नुकतेच आनंद अहुजासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांनतर तिचा करिना कपूरसोबतचा ‘वीरे दि वेडिंग’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने फार काही कमाई केली नसली, तरी चित्रपटातील बोल्डनेसमुळे यातील कलाकार चांगलेच चर्चेत राहिले. आता ‘एक लडकी को देखा…’ या चित्रपटात सोनम अगदीच साध्या आणि सिंपल लुकमध्ये दिसणार आहे.

‘१९४२…’ ची आठवण

Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga Lyrics In Hindi 1942 A Love Story (1995)
अनिल कपूरचे लोकप्रिय गाणं

अनिल कपूर आणि मनिषा कोईराला अभिनीत ‘१९४२ अ लव स्टोरी’ या विदू विनोद चोप्रा यांच्याच चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा…’ या ओळींचा वाप या सिनेमाच्या टायटलसाठी केला आहे. त्याच्या टिजरमध्ये पंजाबच्या एका पारंपारिक कुटुंबाची ही कहाणी असल्याचे दाखवण्यात आले आहे. एका बाप आणि मुलीचे भावनिक नातं चित्रपटातील डायलॉग्समधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना रिअल लाईफ बापलेकीची जोडी रील लाईफमध्ये पाहण्याची उत्सुकता नक्कीच असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -