दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर कोस्टा टिचचा कॉन्सर्टदरम्यान मृत्यू

दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर कोस्टा टिच याचा कॉन्सर्टदरम्यान मृत्यू झाला आहे. कॉन्सर्टवेळी अचानक गाणं गाता-गाता तो खाली कोसळला. कोस्टा टिचने 27 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून त्याचा कॉन्सर्टदरम्यानचा व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाले आहेत.

खरं तर, कोस्टा टिच जोहान्सबर्ग येथील अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करत होता. गाणं गात असताना अचानक तो स्टेजवर कोसळला. कॉन्सर्टदरम्यान त्याचा शेवटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोस्टा गाणं गाताना दिसत आहे शिवाय त्याच्या कॉन्सर्टला उपस्थित असणारे प्रेक्षक डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान, तेवढ्यात अचानक कोस्टा टिच खाली पडतो. त्यानंतर स्टेजवर उपस्थित असलेले कलाकार त्याला उभं करतात. पण दुसऱ्याच क्षणी तो पुन्हा पडतो.

कोस्टा टिचच्या मृत्यूने संगीतक्षेत्रात शोक

कोस्टा टिचच्या निधनाने दाक्षिण आफ्रिकेच्या संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर संगीतक्षेत्रातून शोक व्यक्त केला जात असून सोशल मीडियावरही त्याचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

कोण आहे कोस्टा टिच ?

कोस्टा टिच याचं खरं नाव कोस्टा त्सोबानोग्लू हे आहे. मात्र, कोस्टा टिच या नावाने तो प्रसिद्ध आहे. 1995 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील नेलस्प्रूट येथे कोस्टाचा जन्म झाला होता. त्याची ‘अॅक्टिवेट’ आणि ‘नकलकथा’ ही गाणी लोकप्रिय आहेत. कोस्टा टिच दक्षिण आफ्रिकेतील लोकप्रिय रॅपर आणि गायक आहे.

 


हेही वाचा :