Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'द कपिल शर्मा' शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार?

‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार?

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रियालिटी शो ‘द कपिल शर्मा’चे अनेक चाहते आहेत. या शोमध्ये आत्तापर्यंत भारतातील अनेक दिग्गज कलाकार तसेच राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावली आहे. या शोमुळे अनेकांचे मनोरंजन होते. दरम्यान, अशातच आता या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

कपिलच्या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार ?

एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्माला अनेक प्रश्न विचारण्यात आली. त्यावेळी त्याला विचारण्यात आले की त्याने कधी पंतप्रधान मोदींना कार्यक्रमात बोलावले आहेस. यावर कपिल म्हणाला की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोमध्ये येण्यास नकार दिला नाही. यावर पुन्हा कपिलला विचारण्यात आलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुझ्या कार्यक्रमात आलेले तुला आवडेल का? या प्रश्नाचे उत्तर देत कपिल म्हणला की, मी जेव्हा पर्सनली नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो, तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की, सर कधीतरी आमच्या शोमध्ये देखील या, त्यावेळी त्यांनी मला नकार दिला नाही. ते म्हणाले होते की, सध्या तरी माझे विरोधी खूप विनोद करत आहेत.. कधीतरी येऊ”

‘झ्विगाटो’ 17 मार्च रोजी होणार प्रदर्शित

- Advertisement -

कपिलचा ‘झ्विगाटो’ हा चित्रपट 17 मार्चला रिलीज होणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘झ्विगाटो’ चित्रपट अतिशय गंभीर विषयावर आधारित आहे.


हेही वाचा :

एक अद्भुत माणूस… सतीश कौशिक यांना अमिताभ यांनी वाहिली श्रद्धांजली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -