घरमनोरंजनही पोरगी साजुक तुपातली, हिला 'फरहान'चा लागलाय नाद

ही पोरगी साजुक तुपातली, हिला ‘फरहान’चा लागलाय नाद

Subscribe

मागील एक वर्षापासून दोघे रिलेशनशिप मध्ये असून दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

‘टाईमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोली साजूक तुपातली…’ या गाण्यावर आयटम डान्स करत शिबानी दांडेकरने अनेकांच्या मनावर भुरळ घातली. बॉलिवूड विश्वातील सर्वांत लोकप्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर ही जोडी अनेकांची लाडकी जोडी ठरत आहे. ही जोडी नेहमी एकत्र धम्माल करताना दिसते. यामुळेच अभिनेता फरहानची गर्लफेंड शिबानी सतत चर्चेत असते. या दोघांनी त्यांचे समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. गेल्या वर्षापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

View this post on Instagram

 

#beachbum #thatbrowngirl body by @drewnealpt #bodybydrewneal photo by @faroutakhtar outfit by @hm #nofilter Monday’s!

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

- Advertisement -

सोमवारी दोघांनी आपल्या हॉलिडेचे काही स्पेशल फोटो शेअर केले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये शिबानी खूप हॉट दिसतेय तर फरहानही हॅंडसम दिसतोय. हॉट लूकमध्ये दिसणाऱ्या शिबानीचे हे सगळे फोटो तिच्या बॉयफ्रेंडने म्हणजेच फरहान अख्तरने क्लिक केले आहे.

- Advertisement -

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये अभिनेत्री मॉडेल शिबानी सेक्सी पोज देताना दिसतेय. तिचा हा अनोखा बोल्ड आणि सेक्सी अंदाज सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय ठरतोय. फक्त शिबानीच्याच नाही तर फरहान अख्तरचे चाहत्यांकडून सुद्धा तिच्या हा हॉट लूकला पसंती मिळत आहे.

शिबानीचा जन्म महाराष्ट्रात झाला असला तरी, तिचे शिक्षण ऑस्ट्रेलियात झाले आहे. आयपीएल दरम्यान शो होस्ट करताना ती लाईमलाईटमध्ये आली. यासोबतच ती गायक आणि मॉडेलही आहे. सध्या ती अभिनेता फरहान अख्तरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे.

 

View this post on Instagram

 

Sunshine and smiles. @shibanidandekar ❤️

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

शिबानी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव असते. ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सतत काही न काही अपडेट शेअर करत असते. तिच्या चाहत्यांकडून तिच्या या हॉट आणि बोल्ड लूकला चांगलीच पसंती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -