घरताज्या घडामोडीअखेर #BanLipstick च्या व्हिडिओ ट्रेंडचा अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला खुलासा

अखेर #BanLipstick च्या व्हिडिओ ट्रेंडचा अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला खुलासा

Subscribe

सोशल मिडियावर अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी लिपस्टिक बॅनचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे #BanLipstick हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होत होता.अभिनेत्री अशा प्रकारचा व्हिडिओ शेअर करत असल्यामुळे नेमकी भानगड काय?, असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला होता. अखेर #BanLipstick च्या व्हिडिओ ट्रेंडचा अभिनेत्री तेजस्विनी पंडितने खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्वीनी पंडितने एक व्हिडिओ शेअर केला होता,ज्यात तेजस्विनीने लिपस्टिक पुसत हॅशटॅग बॅन लिपस्टिक या ट्रेंडला सुरुवात केली होती. या व्हिडिओला पाठिंबा देत तेजस्विनीनंतर प्राजक्ता माळी,सोनाली खरे,आदिती सारंगधर,स्मिता गोंदकर यांनी हॅशटॅग बॅन लिपस्टिकचा स्वत:चा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता.

मात्र या लिपस्टिक पुसण्याच्या या नव्या व्हिडिओमागचं रहस्य काय? हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर होते अखेर या नव्या हॅशटॅग बॅन लिपस्टिक व्हिडिओ ट्रेंडचे सत्य चाहत्यांसमोर आले आहे. ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही’ असं म्हणत हॅशटॅग बॅन लिपस्टिक हा ट्रेंड तेजस्विनीमुळे खूपच चर्चेत आला.मात्र तेजस्विनीने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट म्हणजे नेटकऱ्यांच्या प्रश्नाच उत्तर आहे. या पोस्टमध्ये Kill you soon “अनुराधा” या वेबसिरीजचे मोशन पोस्टरची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. “सध्या चर्चेत असलेलं #BanLipstick नक्की काय आहे?त्याचंच उत्तर यात दडलंय.’अनुराधा’ येतेय… “,असे कॅप्शन लिहित तेजस्विनीने नेटकऱ्यांच्या चर्चेला फुलस्टॉप दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

- Advertisement -

‘Kill you soon अनुराधा’ ही वेबसिरीज संजय जाधव यांनी दिग्दर्शित केली आहे. मात्र बॅन लिपस्टिकच्या ट्रेंड मागे ज्या अभिनेत्रींनी हा बॅन लिपस्टिकचा व्हिडिओ ट्रेंड फॉलो केला तेच कलाकार वेबसिरीजमध्ये असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे.

- Advertisement -


हे ही वाचा – अल्पवयीन मुलीला दिला covid-19 लसीचा डोस, झाला मोठा परिणाम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -