घरमनोरंजनसलमान खानच्या 'भारत'च्या पोस्टरचा फर्स्ट लुक

सलमान खानच्या ‘भारत’च्या पोस्टरचा फर्स्ट लुक

Subscribe

नुकतंच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अली अब्बास झाफरनं 'भारत' या चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लुक प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केला आहे.

चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत असणाऱ्या सलमान खानच्या ‘भारत’च्या पोस्टरचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास झाफरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केला आहे. ‘रिंग ऑफ फायर…अँड भारत. ईद २०१९’ अशी कॅप्शन देत अली अब्बास झाफरनं हा पोस्टरचा फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर आणला आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान पाठमोरा बाईकवर दिसत आहे. केवळ पोस्टरचा फर्स्ट लुकच नाही तर ‘भारत’च्या प्रदर्शनाची तारीखही अलीनं यावेळी घोषित केली आहे. पुढच्या वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होईल. पुन्हा एकदा सलमान खानच्या नावे ईदच्या मुहूर्ताची नोंदणी झाली आहे असंच म्हणावं लागेल.

- Advertisement -

‘भारत’ हा सलमान आणि अलीचा ड्रीम प्रोजेक्ट

‘भारत’ हा चित्रपट सलमान खान आणि अली जाफर दोघांचाही ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. साऊथ कोरियन ‘ओ टू माय फादर’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये १९५० ते २०१४ चा कालावधी एका सामान्य नागरिकाच्या नजरेतून पडद्यावर चित्रीत करण्यात आला आहे. ‘भारत’ची कथाही अशाच स्वरूपाची आहे. यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा आतापर्यंतचा कालावधी सलमानच्या भूमिकेच्या नजरेतून दाखवण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान या चित्रपटातून बऱ्याच वर्षांनी प्रियांका चोप्रा आणि सलमान खान पुन्हा एकत्र दिसणार असून प्रियांका चोप्रा ‘बाजीराव – मस्तानी’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये या चित्रपटातून कमबॅक करत आहे. याव्यतिरिक्त दिशा पटानीदेखील आपल्या भूमिकेसाठी सध्या कसून सराव असल्याचा व्हिडिओदेखील अली अब्बास जाफरनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तर सलमान खान ‘भारत’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत असतानाच दुसऱ्या बाजूला ‘दबंग ३’चंदेखील चित्रीकरण करत आहे. ज्यामध्ये सलमानबरोबर पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा प्रेक्षकांना दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -