घरताज्या घडामोडीअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नवऱ्याविषयी पाच माहिती नसलेल्या गोष्टी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नवऱ्याविषयी पाच माहिती नसलेल्या गोष्टी

Subscribe

२०१८ पासून कुणालच्या सोशल मीडियावर सोनाली आणि कुणालचे फोटो पहायला मिळतात

आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अप्सरा म्हणजेच महराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Marathi Acrtress Sonali Kulkarni) सोनालीने यंदा देखिल तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. गेल्यावर्षी सोनालीने २ फेब्रुवारीला गुपचुप दुबईमध्ये साखरपुडा उरकला होता. आता लग्नही सोनालीने गुपचुप उरकले आहे तेही दुबईमध्येच. नुकतीच सोनालीने तिच्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. ७ मे रोजी दुबईत राहणाऱ्या कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) सोबत सोनाली विवाहबंधनात अडकली आहे. दुबईच्या मरिना येथे सोनाली आणि कुणाल यांनी कुटुंबियांच्या उपस्थिती साखरपुडा पार पाडला होता. मात्र लग्नाच्या वेळी दोघांच्याही घरचे त्यांच्या सोबत नव्हते. मित्रमैत्रिणींसोबत सोनाली आणि कुणालने दुबईच्या हिंदू मंदिरात साध्या पद्धतीने लग्न केले आहे. मराठमोळी मुलगी सातासमुद्रात पार जाऊन ज्याच्या प्रेमात पडून त्याच्यासोबत आयुष्यभराची गाठ बांधली तो कुणाल बेनोडेकर नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न सोनालीच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. जाणून घ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नवऱ्याविषयी पाच माहिती नसलेल्या गोष्टी. (Five Unknown Things About Marathi Actress Sonali Kulkarni’s Husband kunal benodekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)


सोनालीच्या ३३ व्या वाढदिवसाच्या मुहूर्तांवर दोघांनी लग्नाचा मुहूर्तही आटपून टाकला. सध्या दोघांच्या फोटोंवर अनेकांच्या शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. दोघांच्याही आई वडिलांनी त्यांना ऑनालाईनच शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले. सोनालीचा नवरा कुणाल बेनोडेकर हा दुबईमध्ये वास्तव्याला आहे. कुणालचे संपूर्ण शिक्षण लंडनच्या मर्चंट्स टेलर स्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर त्याने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक पोलिटिकल सायन्समधून उच्च शिक्षण घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

- Advertisement -


कुणाल बेनोडेकर दुबईमध्ये चार्टड अकांन्टर म्हणून काम करतो. २०१८ पासून कुणालच्या सोशल मीडियावर सोनाली आणि त्याचे फोटो पहायला मिळतात. सोनालीच्या नवऱ्याला ‘केनो’ या नावाने देखिल ओळखले जाते. कोनो कुणालचे टोपण नाव आहे. कुणाल राहणार लंडमधील आहे परंतु तो दुबईमध्ये ASL International या कंपनीमध्ये काम करतो.

सोनाली आणि कुणाल जुलैमध्ये महिन्यात लग्न करणार होते. मात्र ती दुबईमध्ये जातात लॉकडाऊन सुरु झाले. म्हणून दोघांनी कोरोनाच्या कठीण काळात कोणताही जास्त खर्च न करता साध्या पद्धतीने लग्न केले. दोघेही त्यांचे लग्नाचे पैसे कोरोना काळात मदत म्हणून देणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – माधुरी दीक्षित,अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा ओटीटी वर झळकणार !

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -