घरमनोरंजन'गांधी हत्या आणि मी' नाटकासाठी १४ पुस्तकांचा आधार

‘गांधी हत्या आणि मी’ नाटकासाठी १४ पुस्तकांचा आधार

Subscribe

इतिहासातील असही एक पान 'गांधी हत्या आणि मी'...हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या युवकाने दिल्लीमध्ये गांधींची हत्या केली. मात्र, यावेळी नेमके काय घडले? या मागचे कारण काय? त्यावेळी नथुराम गोडसे आणि त्यांचा मोठा भाऊ गोपाळ गोडसे यांच्यातल्या नेमक्या भावना काय होत्या? या सर्व भावना गोपाळ गोडसे यांनी लिहिलेले ‘गांधी हत्या आणि मी’ या पुस्तकातून अनेकांना अनुभवायला मिळाल्या. दरम्यान, सुयोग नाट्यसंस्था याच पुस्तकावर ‘गांधी हत्या आणि मी’ हे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी सज्ज झाले असून या नाटकासाठी १४ पुस्तकांचा आधार घेतल्याचे या नाटकाचे दिग्दर्शक महेश डोईफोडे यांनी सांगितले आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

इतिहासातील असही एक पान ‘गांधी हत्या आणि मी’…या नाटकासाठी १४ पुस्तकांचा आधार घेण्यात आला आहे. यामध्ये सावरकर एक धगधगते यज्ञकुंड या पुस्तकाचा या नाटकासाठी मोठा फायदा झाला आहे. त्यासोबतच लाल किल्ल्यातील आठवणी, सत्याचे प्रयोग अशा अनेक पुस्तकांचा आधार घेत हे नाटक साकारण्यात आले आहे. सुयोग निर्मित ८९ वी कलाकृती ‘गांधी हत्या आणि मी’ हे नाटक येत्या २० डिसेंबर रोजी ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन रंगमंचावर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकात सौरभ गोखले नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणार आहे. तर अंबरीश देशपांडे हे गोपाळ गोडसे यांची प्रमुख भूमिका साकारणार असून रुपाली भोसले या सिंधूची व्यक्तीरेखा साकारणार आहे. या नाटकातून नथुराम गोडसे यांच्या भावविश्वावर प्रकाश टाकण्यात येणार नाटक लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

- Advertisement -

नाटक पाहण्यापेक्षा ते ऐकायला या

इतिहासातील असही एक पान ‘गांधी हत्या आणि मी’…हे नाटक पाहायला याच मात्र, त्यापेक्षा हे नाटक ऐकायला जरुर या. या नाटकातील संगीत हे त्या काळात घेऊन जात, असं हे नाटक आहे. अक्षरश: ती घटना पाहून त्या काळातील क्षण पाहून अंगावर काटा येईल, असे हे नाटक आहे.  – सौरभ गोखले; अभिनेता

- Advertisement -

या नाटकासाठी अनेक पुस्तके वाचली

हा विषय वादग्रस्त असताना देखील हे नाटक साकारण्याची इच्छा झाली. सर्वप्रथम आपल्याला हे नाटक कराव लागत आहे, हे कळल्यावर आधी मी सर्व पुस्तक चाळली. सर्व पुस्तकांचा अभ्यास केला. कारण सिंधू यांची मी भूमिका साकारणार होते. त्यामुळे त्या कशा होत्या. कशा वागायच्या. कशा राहायच्या. या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. तसेच अभिनेता शरद पोंक्षे दादांचीही मदत घेतली.  – रुपाली भोसले; अभिनेत्री

…तरी देखील हे धनुष्य पेले

हे नाटक वादग्रस्त असतानाही हे धनुष्य आम्ही पेले आहे. या नाटकामुळे मला एक वेगळीच जिद्द मिळाली आणि विशेष म्हणजे मला या नाटकात एक महत्त्वाची अशी गोपाळ गोडसे यांची प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली.  – अंबरीश देशपांडे; अभिनेता


हेही वाचा – …आणि चिन्मय मांडलेकरही या नेत्याचा साधेपणा पाहून क्षणभर थांबला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -