घरमनोरंजनदेशातील मुलींनी उर्फीकडून काहीतरी शिकावं... हनी सिंहकडून कौतुक

देशातील मुलींनी उर्फीकडून काहीतरी शिकावं… हनी सिंहकडून कौतुक

Subscribe

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. तिच्या कपड्यांवरून अनेकांनी तिला टार्गेट केले. सोशल मीडियावरचं नाही तर राज्याच्या राजकारणात आता उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांचा मुद्दा गाजतोय. उर्फी सार्वजनिक ठिकाणीही अतिशय तोकड्या कपड्यात फिरते. दरम्यान, अशातच आता बोल्ड आणि बिनधास्त उर्फीने सुप्रसिद्ध रॅपर हनी सिंहचं लक्ष देखील वेधून घेतलं. हनी सिंहला उर्फीच्या स्टाईलची भूरळ पडली आहे.

हनी सिंहने केलं उर्फीचं कौतुक
उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. या फॅशनमुळे अनेकदा तिला ट्रोलर्सचा सामना देखील करावा लागतो. मात्र, प्रत्येक टीकेला उर्फी सडेतोड उत्तर देताना दिसते. अशातच प्रसिद्ध रॅपर हनी सिंहने उर्फीच्या फॅशनचं कौतुक केलं आहे.

- Advertisement -

मुलींनी उर्फीकडून काहीतरी शिकावं…

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

हनी सिंह उर्फीचं कौतुक करत म्हणाला की, मला तर ती खूप आवडली. ती खूप निडर आणि शूर मुलगी आहे. जी तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने जगते. “मला वाटतं की, आपल्या देशातील मुलींनी तिच्याकडून काहीतरी शिकायला हवं. कोणालाही न घाबरता, कोणतीही शंका मनात न आणता, तुम्ही कुठूनही आला असला तरी आणि तुमची कोणतीही जात, धर्म असला तरी जे तुमच्या मनात आहे. ते करा. तुमच्या कुटुंबाचे नाव खराब होईल असे काही करु नका पण मनात जे तुम्हाला चांगलं करु वाटेल ते न घाबरता करा.”

- Advertisement -

 


हेही वाचा :

दिल्ली अपघातातील तरुणीच्या कुटुंबीयांना शाहरुख खानचे मीर फाऊंडेशन करणार आर्थिक मदत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -