Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन आमच्या कल्पनेपेक्षा मोठे कुटुंब मिळाले... परिणीतीची नवी पोस्ट चर्चेत

आमच्या कल्पनेपेक्षा मोठे कुटुंब मिळाले… परिणीतीची नवी पोस्ट चर्चेत

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचा नेता राघव चड्ढा यांचा शनिवारी दिल्लीतील कपूरथलामध्ये मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच परिणीतीच्या नव्या पोस्टने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.

परिणीतीची नवी पोस्ट चर्चेत

या पोस्टमध्ये परिणीतीने लिहिलंय की, “राघव आणि मला गेल्या काही दिवसांत आणि विशेषतः आमच्या साखरपुड्यादरम्यान मिळालेल्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत. आम्हा दोघांचे जग खूप वेगळे आहे पण जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आमचे हे जग एकमेकांशी जोडले गेले हे जाणून आम्हाला देखील आश्चर्य वाटले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

- Advertisement -

“आमच्या कल्पनेपेक्षा मोठे कुटुंब आम्हाला मिळाले आहे. आम्ही जे काही वाचलं आहे आणि पाहिलं आहे त्याला आम्ही स्पर्श केला आहे त्यामुळे आता आमच्याकडे धन्यवाद म्हणण्यासाठी देखील शब्द अपूर्ण आहेत. आम्ही या प्रवासाकडे सुरुवात करत असताना तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात. आमच्या मीडियातील खास मित्रांचे खूप खास आभार. दिवसभर तिथे राहिल्याबद्दल आणि आम्हाला आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.” असं परिणीती म्हणाली.

अनेकदा एकत्र दिसल्याने सुरू झाली अफेअरची चर्चा

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

मागील काही महिन्यांपूर्वी हे दोघे सलग दोन दिवस लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसले. याशिवाय हे मुंबई ते दिल्ली एकत्र प्रवास करतानाही दिसले. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. ही जोडी यंदा ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एका फॅमिली फंक्शनमध्ये रोका पार पडला होता. यावेळी ते दोघेही खूप खूश होते.


- Advertisement -

हेही वाचा :

मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या Big b च्या मदतीला आला बाईकस्वार

- Advertisment -