“राज्यातील जनता भाजपच्या भ्रष्टाचाराला कंटाळली..”, राष्ट्रवादीच्या नेत्याने साधला निशाणा

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही भाजपच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेली आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर निशाणा साधला. महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत आपले मत मांडले.

कर्नाटकात भाजपचा पराभव झाल्यानंतर सगळीकडूनच त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे जे गेल्या काही महिन्यांपासून शिंदे-फडणवीस यांच्या बाजूने बोलताना पाहायला मिळत होते, ते देखील कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर भाजपवर टीका करत आहेत. राष्ट्रवादीच्या तर सर्वच नेत्यांनी भाजपवर टीका केलेली आहे. पण आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याने भाजपवर टीकास्त्र डागले आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही भाजपच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेली आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर निशाणा साधला. महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत आपले मत मांडले. त्यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. (“The people of the state are fed up with BJP’s corruption.”, NCP leader hit the mark)

हेही वाचा – 16 आमदारांचा निर्णय लवकरात लवकर घ्या, ठाकरे गट आक्रमक अध्यक्षांची भूमिका काय?

“विधानसभा निवडणुकीत जवळपास 50 टक्के जागा गमावून मोठा पेच निर्माण करणाऱ्या भाजपला कर्नाटकने साफ नाकारले आहे. ज्या पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला असतानाही भाजपचा दारुण पराभव होतो याचा अर्थ पंतप्रधानांची प्रतिमा घसरली आहे हे स्पष्ट होत आहे,” असे यावेळी महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. तसेच “कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. आता शिंदे – फडणवीस सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही व्यापक प्रचार मोहीम राबवणार आहोत. रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आदरणीय शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात काय म्हटले आहे आणि महाविकास आघाडीला घालवण्यासाठी राज्यपालांच्या कार्यालयाचा दुरुपयोग कसा झाला हे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगणार आहोत,” अशी माहिती यावेळी तपासे यांच्याकडून देण्यात आली.

वज्रमूठ सभा पु्न्हा सुरू होणार
अचानक आलेल्या उष्णतेमुळे महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हवामानाच्या परिस्थितीनुसार पुन्हा सुरू करू. तसेच या सभेत कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे यावेळी तपासे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याबाबतची घोषणा करताच वज्रमूठ सभा होणार नाही, अशी माहिती देण्यात आली होती. पण हवामानाचे कारण पुढे करत या सभांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

भाजपचा हा डाव त्यांच्यावरच बूमरँग होईल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर भाजप करत आहे. जयंत पाटील हे उच्च सचोटीचे आणि नैतिक चारित्र्याचे व्यक्ती आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे केंद्रीय एजन्सींद्वारे दबाव आणून त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही भाजपचा हा डाव त्यांच्यावरच बूमरँग होईल, असे यावेळी महेश तपासे यांच्याकडून सांगण्यात आले.