घरमनोरंजनरुबीना - अभिनवच्या लग्नाची पत्रिका पाहिली का?

रुबीना – अभिनवच्या लग्नाची पत्रिका पाहिली का?

Subscribe

लहान पडद्यावरील 'शक्ती' रूबिना दलैक आणि अभिनव शुक्ला २१ जूनला अडकणार लग्नबंधनात.

हे वर्ष म्हणजे सेलिब्रिटी लग्नाचा सीझन आहे. सोनम कपूर, अनुष्का शर्मा अशा अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्या. दीपिका पडुकोन आणि रणवीर सिंगच्यादेखील लग्नाची चर्चा चालू आहे. यात भर पडली आहे ती, लहान पडद्यावरील ‘शक्ती’ रूबिना दलैक आणि अभिनव शुक्लाच्या लग्नाची. २१ जूनला हे दोघेही लग्न करणार असून रूबिना आणि अभिनवच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे.

abhiru
रूबिना आणि अभिनव

प्रसिद्ध छोटी बहू लवकरच होणार ‘बहू’

सिमलामधील प्रसिद्ध वूडविले पॅलेसमध्ये रूबिना आणि अभिनव विवाहबद्ध होणार आहेत. रुबिनानं आपल्या लग्नाची इको-फ्रेंडली लग्नपत्रिका पोस्ट केली होती. लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार असल्याचं सांगितलं. ही लग्नाची पत्रिका एमडीएफ वूड आणि रिसायकल करण्यात आलेल्या कागदांपासून बनवण्यात आल्याचं तिनं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. लग्न म्हणजे मजा असावीच पण निसर्गावर प्रेम करणाऱ्या गोष्टींचा यामध्ये समावेश असावा यासाठी लोकांना आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे, त्यामुळं आम्ही असं लग्नाचं कार्ड बनवलं असल्याचं रूबिनानं सांगितलं आहे. विराट आणि अनुष्काच्या लग्नपत्रिकेप्रमाणेच ही पत्रिका असल्याचं विचारलं असता आपल्याला त्याविषयी काहीच माहीत नव्हतं असं रूबिनानं स्पष्ट केलं असून हा निव्वळ योगायोग आहे असंही ती म्हणाली. पण पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या पिढीमध्ये आम्ही असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचं तिनं स्पष्ट केलं.

- Advertisement -

सिक्रेट सात वचनं

लग्नात घेण्यात येणाऱ्या सात वचनांसह रूबिना आणि अभिनव वेगळी सात सिक्रेट वचनं घेणार आहेत. एकमेकांच्या जीवनात वचनबद्धता आणि एकमेकांसाठी असणारी मूल्य जपणारी ही वचनं असतील असं रूबिनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईत २८ जूनला जुहू तारा रोडवरील किशोर कुमार बंगल्यामध्ये कुटुंबीय आणि कलाविश्वातील मित्र – मैत्रिणींसाठी रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -