घरमनोरंजननेहाला ट्रोल करणाऱ्यांवर भडकला हिमांश कोहली

नेहाला ट्रोल करणाऱ्यांवर भडकला हिमांश कोहली

Subscribe

हाला शो मधील तिच्या हळवेपणामुळं ट्रोल करत लोकांनी बरेच मीम्सदेखील बनवले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेहाची खिल्ली उडवण्यात आली. मात्र हिमांश नेहाच्या मदतीला धावून आला आहे.

नेहा कक्कर ही भारतातील सध्याची आघाडीची गायिका असून नुकतंच सुरु झालेल्या ‘इंडियन आयडॉल’ या सिंगिंग रियालिटी शो ची परीक्षक आहे. मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या भागांनंतर नेहा कक्करला मोठ्या प्रमाणात तिच्या हळवेपणासाठी ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र नेहाच्या समर्थानार्थ तिचा कथित प्रियकर आणि अभिनेता हिमांश कोहलीनं यावर भडकला आहे. नेहाला शो मधील तिच्या हळवेपणामुळं ट्रोल करत लोकांनी बरेच मीम्सदेखील बनवले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेहाची खिल्ली उडवण्यात आली. मात्र हिमांश नेहाच्या मदतीला धावून आला आहे.

- Advertisement -

हिमांशनं इन्स्टाग्रामवर लिहिली मोठी पोस्ट

हिमांश कोहलीनं नेहाला पाठिंबा देत इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. ‘नेहाला खूप लोक ट्रोल करत आहेत हे मी बघतो आहे. ही फक्त मस्करी असती तर कदाचित मीदेखील सार्वजनिक स्तरावर बोललो नसतो. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की, काही लोक चांगल्या गोष्टींना पाठिंबा का देत नाहीत? आणि असं जर कोणी करत असेल तर, त्याला पाठी ओढण्याचे मात्र प्रयत्न करतात.’ अशा स्वरुपाचं मत हिमांशनं मांडलं आहे. तर ‘हे ट्रोल करणाऱ्यांना या जोक्समागे लपून अमानवीय व्यवहार करून सुटतील असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. नेहानं याठिकाणी पोचण्यासाठी खूप मेहनत केली आहे आणि ही जागा सांभाळण्यासाठी आजही ती तितकीच मेहनत करत आहे. नेहू, तू अतिशय उत्तम माणूस आहेस आणि कोणत्याही गोष्टींमुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुझं यश, तुझं प्रेम हे सर्व या जोकरांपेक्षा खूप जास्त मोठं आहे.’ अशी भावनिक पोस्ट हिमांशनं नेहासाठी लिहिली आहे.

Lately, I have been noticing a lot of distasteful trolling against @nehakakkar . I would have never said this in public if it was just a humorous act. What disgusts me is that people themselves don’t want to support a cause. And then they don’t leave any stone unturned to stop someone from doing so. If these trollers think that they can hide their ignorance and inhuman attitude beneath objectionable jokes, they are wrong. In the era where most are narcissists, it is hard to find a selfless person like her. She has worked very hard to become who she is today and to maintain it, is another task. Nehuu, don’t let anything affect the best person I know. Your success, your care, your love, speaks louder than a few jokers. Keep inspiring us all. Love, #Heeman ❤ #NehaKakkar #Himanshkohli #StopTrolling #BadTrolls

A post shared by Himansh Kohli (@kohlihimansh) on

- Advertisement -

हिमांश आणि नेहा नात्यात?

हिमांश आणि नेहा हल्ली बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसत असून ‘ओ हमसफर’ या अल्बममध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. दोघांमध्येही मैत्रीपेक्षा अधिक नातं असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. मात्र अजूनही दोघांनीही याबाबतीत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -