घरमहाराष्ट्रNashik Constituency : गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपा आक्रमक; पदाधिकारी घेणार फडणवीसांची भेट

Nashik Constituency : गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपा आक्रमक; पदाधिकारी घेणार फडणवीसांची भेट

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असले तरी अद्याप महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशातच नाशिक लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच काल, रविवारी शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी देखील, निश्चिंत राहा, तुमच्यावर अन्याय होणार नाही, असा त्यांना शब्द दिला. मात्र आता हेमंत गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. (Nashik Constituency After Hemant Godses power show BJP aggressive Officials will meet Devendra Fadnavis)

हेही वाचा – PHOTO : रंग आनंदाचे, क्षण कुटुंबसौख्याचे…; मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासोबत साजरी केली धुळवड

- Advertisement -

महायुतीत नाशिकच्या जागेवर शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीच नाशिकमधील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ही घोषणा केली होती. गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पूर्ण बहुमताने पाठवायचे आहे, असे ते म्हणाले होते. यानंतर हेमंत गोडसे यांनी रविवारी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी शक्तिप्रदर्शन केले. मात्र, स्थानिक पातळीवर भाजपा पदाधिकाऱ्यांचा त्याला विरोध आहे. नाशिक भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत, पक्षीय बलाबल बघता नाशिकची जागा भाजपाला मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे महायुतीत नाशिकच्या जागेवरून धुसफूस वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपाचे पदाधिकारी फडणवीसांची घेणार भेट

हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर नाशिक लोकसभा जागेवरून भाजपा आणि शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमधील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. शहरातील सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत, त्यामुळे ते आज या जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संध्याकाळी बंगल्यावर भेट घेणार  आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नाशिकच्या जागेसंदर्भात काय निर्णय होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mahayuti Seat Sharing : भाजपाकडून 23 उमेदवार घोषित, 9 ठिकाणी थेट लढत; मात्र शिंदे-अजित पवार गटाचं काय?

नाशिकची जागा मनसेलाही मिळण्याची शक्यता

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहां यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यामुळे येत्या काही दिवसात मनसेचीही महायुतीत एन्ट्री होण्याची शक्यता आहे. मनसेचा मुंबईमध्ये जम बसलेला आहे, त्यामुळे दक्षिण मुंबईतील जागा मनसेला सोडावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यासोबत नाशिक किंवा शिर्डी या दोन मतदारसंघांपैकी एक जागा भाजपा मनसेला सोडण्याची शक्यता आहे. याशिवाय दक्षिण मुंबईतून राज ठाकरेंचे निष्ठावान मनसैनिक आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नाशिकची जागा कोणाला मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -